वेल्ह्यात लसीकरणावर भर देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:10 AM2021-04-07T04:10:20+5:302021-04-07T04:10:20+5:30

तहसील कार्यालय येथे कोरोना संसर्ग प्रतिबंध समितीची बैठक नुकतीच घेण्यात आली, वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात ...

Emphasis will be placed on vaccination in Velha | वेल्ह्यात लसीकरणावर भर देणार

वेल्ह्यात लसीकरणावर भर देणार

Next

तहसील कार्यालय येथे कोरोना संसर्ग प्रतिबंध समितीची बैठक नुकतीच घेण्यात आली, वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली. तालुक्यांमध्ये लसीकरणाचे प्रमाण वाढले पाहिजे यासाठी आरोग्य विभागाकडून 11 ठिकाणी लसीकरणाची सोय करण्यात आलेली आहे ,वय वर्ष 60 च्या पुढील 95 टक्के लोकांनी लस घेतली आहे, तर वय वर्ष 45 च्या वरती असणाऱ्यांनी 50 टक्के लोकांनी लस घेतले आहे. आतापर्यंत तालुक्‍यात ७००० च्या आसपास लस घेतलेली आहे. तालुक्यातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या बैठकीचे नियोजन करण्यात आलेले आहे. तसेच पोलीस प्रशासनास जास्तीत जास्त कारवाई करण्याचे सूचना देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये मंगल कार्यालय हॉटेल्स, लग्न समारंभ इत्यादी सार्वजनिक समारंभ आदी ठिकाणी पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच तालुक्यात दोन ठिकाणी चाचण्या केल्या जात असून चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. कोरोना विरोधी जन अभियान पुणे चे सदस्य त्रिपाद कोंडे राजेंद्र रणखांबे यांनी वेल्हे बाजारपेठेमध्ये जाऊन दुकानदारामध्ये जनजागृती केली व दुकानदाराला कोरोनाचे नियम पाळण्याचे विनंती केली.

ओळ १) कोरोना ची लस घेतल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नाही. लस घेतल्यानंतर जरी कोरोनाची बाधा झाली असली तरीदेखील हा रुग्ण लवकर बरा होतो. त्यामुळे सर्वांनी लस घ्या.

: डॉ. अंबादास देवकर, तालुका वैद्यकीय अधिकारी वेल्हे

२) निवडणुकीच्या वेळी मतदार राजाला मतदान केंद्रावर आणण्यासाठी ज्याप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच प्रयत्न करीत होते, त्याच प्रमाणे कोरोनाची लस घेण्यासाठी सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी देखील प्रयत्न करावा:

दिनकर धरपाळे जिल्हा परिषद सदस्य पुणे

तहसील कार्यालय वेल्हे (ता. वेल्हे) कोरोना संसर्ग प्रतिबंध समितीची बैठकीत बोलताना तहसीलदार शिवाजी शिंदे व जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे गट विकास अधिकारी विशाल शिंदे व इतर.

Web Title: Emphasis will be placed on vaccination in Velha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.