रस्त्यालगत कचऱ्याचे साम्राज्य; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:10 AM2020-12-08T04:10:31+5:302020-12-08T04:10:31+5:30

धायरी : महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या धायरी भागातील वाढते नागरीकरण, लोकसंख्यावाढीमुळे कचरा निर्मितीचे प्रमाण वाढले आहे, तुलनेत दररोज ...

Empire of roadside garbage; Ignorance of the people's representatives | रस्त्यालगत कचऱ्याचे साम्राज्य; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

रस्त्यालगत कचऱ्याचे साम्राज्य; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

googlenewsNext

धायरी : महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या धायरी भागातील वाढते नागरीकरण, लोकसंख्यावाढीमुळे कचरा निर्मितीचे प्रमाण वाढले आहे, तुलनेत दररोज होणाऱ्या कचऱ्याचे ओला आणि सुका कचरा वर्गीकरण योग्य पद्दतीने होत नसल्याचे पाहावयास मिळत आहे. पुरेशा साधनसामग्रीचा अभाव, मनुष्यबळाची कमतरता यामुळे नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेल्या धायरी भागातील कचरा नियमित उचलला जात नसल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याची तक्रार येथील नागरिक करीत आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करूनही महापालिका व लोकप्रतिनिधी याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

रायकर मळा, बेनकर वस्ती, साईधाम, डीएसके विश्व् सोसायटी रस्ता परिसर आदी भागात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. पालिकेकडून वेळोवेळी कचरा उचलला जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा त्रास होत आहे. त्याची दखल घेऊन पालिकेने योग्य ती कार्यवाही करावी, यासाठी अनेकदा पाठपुरावा करून देखील दुर्लक्ष करण्याचे धोरण पालिका प्रशासन घेत आहे, अशी तक्रार या भागातील नागरिकांनी केली. या भागात कचऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला असून यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याचा आरोपही केला जात आहे.

धायरी डीएसके रस्त्यालगत असणाऱ्या सोसायटी परिसरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे.धायरी परिसरातील हॉटेल्स, दुकाने,भाजी मंडईचे दुकानदार तसेच आजूबाजूचे सर्व लोक या ठिकाणी कचरा आणून टाकतात त्यामुळे सोसायटी आणि परिसरात प्रचंड डासांचा उपद्रव झाला आहे तसेच हॉटेलचा ओला कचऱ्यामुळे घाणेरडा दुर्गंध सुटतो, त्यामुळे या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. रात्रभर कचऱ्याच्या दुर्गंधीचा, डासांचा आणि कुत्र्याचा भुंकण्याचा त्रास येथील रहिवाशांना होत आहे,तसेच दुर्गंधीमुळे रोगराई पसरत आहे. तसेच परिसरात सोसायटीधारक राहत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यावर महानगरपालिकेने कारवाई करावी, तसेच या परिसरात डासांचा उपद्रव कमी करण्यासाठी कीटक नाशक,धुराची फवारणी करण्यात यावी म्हणजे रोगराईला आळा बसेल अशी येथील नागरिकांची मागणी आहे

Web Title: Empire of roadside garbage; Ignorance of the people's representatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.