कर्मचाऱ्याला चोपले?
By admin | Published: May 26, 2017 06:11 AM2017-05-26T06:11:54+5:302017-05-26T06:11:54+5:30
पालिकेने पाणीकपात केल्यापासून दिघीच्या पूर्वेकडील पाणीपुरवठा विस्कळीत आहे. अनियमित वेळा, अनियमित पुरवठा, तर कधी पाण्याचा पत्ताच नसल्याने संतप्त नागरिकांनी पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
दिघी : पालिकेने पाणीकपात केल्यापासून दिघीच्या पूर्वेकडील पाणीपुरवठा विस्कळीत आहे. अनियमित वेळा, अनियमित पुरवठा, तर कधी पाण्याचा पत्ताच नसल्याने संतप्त नागरिकांनी पाणी सोडणाऱ्या कामगारास सकाळी मारहाण केल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. अधिकाऱ्यांच्या बेपर्वा कारभाराचा कामगारांना नाहक त्रास होत असल्याचे बोलले जाते.
दिघीतील रुणवाल पार्क, समर्थनगर, गायकवाडनगर, परांडेनगर, दिघी गावठाण, चौधरी पार्क, विजयनगर या पूर्वेकडील भागात पाणीकपात झाल्यापासून नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. संजय डोंगरे या कामगारास गावठाणातील नागरिकांनी जाब विचारला. त्यांनी अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे पाणी सोडल्याचे सांगितले. त्यावरून वाद निर्माण होऊन कामगाराच्या कानशिलात लगावण्यात आल्याचे बोलले जात आहे. मारहाण करण्याचा हेतू नव्हता. मात्र ्रवेळी पाणी सोडण्याचे कारण विचारले असता उलट उत्तर दिले. या अपरात्री पाणी सोडताना पाणीपुरवठा विभागाच्या कामगारांना रंगेहाथ पकडल्याचा दावा वाळके यांनी केला.