एअर इंडियामधील कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 01:21 AM2018-10-22T01:21:34+5:302018-10-22T01:21:37+5:30
व्यवस्थापनाशी सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर रविवारी एअर इंडियाच्या करारपद्धतीवरील सुमारे १०० कर्मचा-यांनी लोहगाव विमानतळावरील कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन केले.
पुणे : व्यवस्थापनाशी सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर रविवारी एअर इंडियाच्या करारपद्धतीवरील सुमारे १०० कर्मचा-यांनी लोहगाव विमानतळावरील कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. मात्र, या कर्मचाºयांनी प्रवाशांना त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक महत्त्वाची कामेही पार पाडली. त्यामुळे आंदोलनाचा फटका विमान उड्डाणांना बसला नाही.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद सोमवारी पुण्यात येत असल्याने त्याच्या आदल्या दिवशीच कर्मचाºयांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने व्यवस्थापनाची तारांबळ उडाली. आंदोलन केलेले कर्मचारी एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस लिमिटेडने करार तत्त्वावर घेतले आहेत. चेकइन, बोर्डिंग पास, तिकीट तपासणी, बोर्डिंग उद्घोषणा व इतर कामे करतात. कंपनीच्या विमानतळावरील व्यवस्थापकाशी शनिवारी वाद झाला होता. त्यामुळे या व्यवस्थापकांना हटविण्याची मागणी कर्मचाºयांनी आंदोलनाच्या माध्यमातून केली. कर्मचाºयांची कोल्हापूरला बदली करण्याची, करार रद्द करण्याची धमकी देतात. तसेच शुक्रवारी तीन महिलांसह एकूण सात जणांचा करार रद्द केल्याचे कर्मचाºयांनी सांगितले. दरम्यान, आंदोलनामुळे एअर इंडियाच्या खिडकीसमोर गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे प्रवाशांना काहीसा त्रास सहन करावा लागला. सायंकाळी ज्येष्ठ अधिकाºयाने कर्मचाºयांची भेट घेऊन हा मुद्दा मंगळवारी सोडविण्याचे आश्वासन दिले. सोमवारी राष्ट्रपदी रामनाथ कोविंद पुण्यात येत असल्याने आंदोलन मागे घेण्याची विनंती त्यांनी केली आहे.