कर्मचाऱ्यांना नाहीत निवासस्थाने

By admin | Published: July 9, 2015 11:13 PM2015-07-09T23:13:26+5:302015-07-09T23:13:26+5:30

काम झाले नसल्याने उद्घाटन होऊन ११ महिने उलटले, तरी उपजिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना त्यांची हक्काची निवासस्थाने अद्याप मिळालेली नाहीत.

Employees do not have a residence | कर्मचाऱ्यांना नाहीत निवासस्थाने

कर्मचाऱ्यांना नाहीत निवासस्थाने

Next

इंदापूर : विजेचे स्वतंत्र मीटर व पिण्याच्या पिण्यासाठी नळजोडणी करण्याचे केवळ आठवडाभरात होणारे काम झाले नसल्याने उद्घाटन होऊन ११ महिने उलटले, तरी उपजिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना त्यांची हक्काची निवासस्थाने अद्याप मिळालेली नाहीत. सध्या एकूण ४६ कर्मचाऱ्यांपैकी १५ कुटुंबे पडझड झालेल्या जुन्या कर्मचारी वसाहतीत राहतात. उर्वरित ३२ कर्मचारी भाड्याने घरे घेऊन राहत आहेत.
इंदापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सन २०१४मध्ये तीन इमारतींमध्ये ३२ निवासस्थाने बांधून पूर्ण करण्यात आली. शुक्रवारी (दि. ८ आॅगस्ट २०१४) होणारा उद्घाटन कार्यक्रम रद्द झाला. त्यानंतर प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते निवासस्थानाच्या इमारतीचे उद्घाटन झाले. इमारतीमधील वीजजोडणी, नळजोडणीची कामे त्या वेळी अपूर्ण होती. त्यामुळे उद्घाटन होऊनदेखील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना तेथे राहण्यासाठी जाता आले नाही. ही स्थिती ११ महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी आहे तशीच आहे.
उपजिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यासह ४६ कर्मचारी आहेत. नळ व मीटर
जोडणीची कामे त्वरित व्हावीत, असा कर्मचाऱ्यांचा आग्रह आहे. त्यासाठी त्यांनी गेल्या १३ जूनला
आमदार दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली होती.
त्यांनी १ जुलैपर्यंत थांबा, असे सांगितले होते. त्याला आठवडा उलटून गेला. मात्र, पुढे काहीही हालचाल झाली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. (वार्ताहर)

जुन्या निवासस्थानांची ही दुरवस्था झाली आहे. खिडक्या-दारांची स्थिती दयनीय आहे. छप्पर गळत असल्याने घरात बसून पावसाचा ‘आनंद’ लुटता येतो. वरखाली ओलं होत असल्याने, कुठेही न जाता बर्फाळ प्रदेशातील रहिवासाचा अनुभव घेता येतो, असे तेथील कर्मचाऱ्यांनी अत्यंत खेदाने सांगितले.

Web Title: Employees do not have a residence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.