कर्मचारी, अधिकाऱ्यांनी खाकीची शान वाढवली : नामदेव शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:08 AM2021-06-03T04:08:42+5:302021-06-03T04:08:42+5:30
शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप सोनवणे व सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय थोरात यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमप्रसंगी नामदेव शिंदे बोलत ...
शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप सोनवणे व सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय थोरात यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमप्रसंगी नामदेव शिंदे बोलत होते. या वेळी परिक्षाविधीन उपविभागीय पोलीस अधिकारी मयूर भुजबळ, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे व अधिकारी कर्मचारी व कुटुंबीय उपस्थित होते. सोनवणे व थोरात यांनी निष्कलंक व उत्कृष्ट सेवा बजावल्यामुळे अनेक पदकांचे मानकरी ठरले व पोलीस खात्याची मान उंचावेल अशी कामगिरी केली असून, त्यांचे काम आदर्शवत असल्याचे नामदेव शिंदे यांनी सांगितले. मोर्चा, आंदोलन, निवडणुका आदी ठिकाणी बंदोबस्त केला, जीव धोक्यात घालून अनेक आरोपींना पकडले, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडली, सहकाऱ्यांनी दिलेली साथ यामुळे सेवानिवृत्ती यशस्वीपणे होत आहे, याचा आनंद असल्याचे दिलीप सोनवणे व दत्तात्रय थोरात यांनी सांगितले.
दरम्यान, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सेवानिवृत्ती सत्कारानंतर सोनवणे व थोरात यांना अनोख्या पद्धतीने निरोप दिला. पोलीस निरीक्षक च्या खुर्ची वर बसवून एका तासासाठी त्यांना कार्यभार सांभाळण्यास दिला. त्यामुळे दोघेही आनंदी व समाधानी होऊन कुटुंबीयसमवेत फोटोसेशन केले व निरोप घेताना डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.
--------------------------
दिलीप सोनवणे व दत्तात्रय थोरात यांचा सत्कार करताना नामदेव शिंदे व इतर
०२०६२०२१-बारामती-०२