एसटीच्या भाडेतत्त्वावर गाड्या घेण्याच्या निर्णयास कर्मचारी संघटनेचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:11 AM2021-05-23T04:11:27+5:302021-05-23T04:11:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: राज्य परिवहन महामंडळ खासगी ५०० गाड्या भाडे तत्त्वावर घेण्याच्या विचारात आहे. या गाड्या ...

Employees' union opposes ST's decision to hire vehicles | एसटीच्या भाडेतत्त्वावर गाड्या घेण्याच्या निर्णयास कर्मचारी संघटनेचा विरोध

एसटीच्या भाडेतत्त्वावर गाड्या घेण्याच्या निर्णयास कर्मचारी संघटनेचा विरोध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: राज्य परिवहन महामंडळ खासगी ५०० गाड्या भाडे तत्त्वावर घेण्याच्या विचारात आहे. या गाड्या घेतल्या तर त्यांना चांगले उत्पन्न असलेल्या मार्गावर वाहतुकीस परवानगी दिली जाईल. परिणामी, एसटीचा प्रवासी एसटीतून प्रवास न करता त्या गाड्यातून प्रवास करेल. यामुळे एसटीचे प्रवासी कमी होऊन त्याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावर होणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळने हा निर्णय रद्द करावी, अन्यथा आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने केला आहे.

या खासगी गाड्यांचे पार्किंग व मेंटेनन्ससाठी महामंडळाच्या मालकीच्या जागा देणे, तसेच जास्त उत्पन्न आणणारे महामंडळाचे मार्गही खासगी वाहतूकदारांना देण्याच्या हालचाली प्रशासकीय स्तरावर सुरू आहेत ही अत्यंत गंभीर बाब आहे. यापूर्वी भाडेतत्त्वावरील शिवशाही बसला जास्त उत्पन्नाचे मार्ग देण्यात आले आहेत त्याचीच पुनरावृत्ती आता केली जात आहे ही बाब महामंडळास गंभीर बाधा आणणारी असून, खासगी वाहतुकीला प्रोत्साहन देणारी आहे. त्यामुळे हा निर्णय महामंडळाने तत्काळ रद्द करावा, असेही निवदेनात म्हटले आहे.

कोट : भाडेतत्त्वावर ५०० गाड्या घेणे हा एसटीवर अन्यायकारक निर्णय आहे. यामुळे एसटीचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे आम्ही हा निर्णय तत्काळ रद्द करावा अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन करू.

- संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना, पुणे.

Web Title: Employees' union opposes ST's decision to hire vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.