डेक्कन कॉलेजमध्ये रोजगाराभिमुख अभ्यासक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:17 AM2021-08-18T04:17:05+5:302021-08-18T04:17:05+5:30
डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ २०२०-२१ दरम्यान द्विशताब्दी वर्ष साजरे करत आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असून, विद्यापीठातर्फे ...
डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ २०२०-२१ दरम्यान द्विशताब्दी वर्ष साजरे करत आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असून, विद्यापीठातर्फे राबविल्या जाणाऱ्या नवीन उपक्रमांबाबत माहिती देताना कुलगुरू प्रमोदकुमार पांडे बोलत होते. या वेळी प्रा. प्रसाद जोशी, सोनल कुलकर्णी, प्रा. पी. डी. साबळे, डॉ. तृप्ती मोरे, डॉ. श्रीकांत गणवीर उपस्थित होते.
पांडे म्हणाले, पुरातत्त्व, मानवशास्त्र, भाषाशास्त्र आणि संस्कृत व कोशशास्त्र या विषयातील उच्च शिक्षणासाठी डेक्कन कॉलेज प्रसिद्ध आहेत. डेक्कन कॉलेजमध्ये विविध शैैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी देश विदेशातून विद्यार्थी येतात. जगातील आणि भारतातील उच्च शैैक्षणिक संस्थांबरोबरचे संबंध दृढ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आता राज्य शासनाच्या व उच्च शिक्षण विभागाच्या मान्यतेनंतर पर्यावरणीय पुरातत्त्व, संगणकीय भाषाशास्त्र, वस्तुसंग्रहालयशास्त्र आणि वारसास्थळ व्यवस्थापन व वैैज्ञानिक संवर्धन हे रोजगाराभिमुख सुरू केले जाणार आहेत.