आदिवासी महिलांना रोजगार प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:12 AM2020-12-31T04:12:44+5:302020-12-31T04:12:44+5:30
डिंभे येथे झालेल्या या प्रशिक्षणासाठी शबरी आदिवासी विकास महामंडळाच्या शाखा व्यवस्थापक सविता चकवे-डुंबरे, वरिष्ठ जिल्हा समन्वयक अधिकारी अर्चना ...
डिंभे येथे झालेल्या या प्रशिक्षणासाठी शबरी आदिवासी विकास महामंडळाच्या शाखा व्यवस्थापक सविता चकवे-डुंबरे, वरिष्ठ जिल्हा समन्वयक अधिकारी अर्चना क्षिरसागर, प्रशिक्षक विजय सांबरे, सारंग पांडे, गौरव काळे, मनिषा जरकड, अमोल केदारी, संदेश पवार, मंगेश उनकुले उपस्थित होते.
पंतप्रधान वनधन विकास योजनेतून माझे वन - माझे धन - माझा उद्योग या उद्दीष्टाने हे प्रशिक्षण देण्यात आले.
महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या समन्वयाने आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात अनेक बचत गट काम करत आहेत. बचत गटां मार्फत हिरडा, बेहडा अशा अनेक गौणवनोपजावर काम करण्यासाठी जिज्ञासा लोक संचलित वनधन केंद्र मुंजुरझाले आहे. यामध्ये गोहे बुद्रूक, गोहे खुर्द, चपटेवाडी, कानसे, डिंभे या भागातील महिलांनी वनधन केंद्र उभे करावे यासाठी आवश्यक दोन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले.