परदेशात मॅनेजर पदावर कामाला लावून देतो; एकाची २८ लाखांची फसवणूक
By भाग्यश्री गिलडा | Published: January 28, 2024 05:52 PM2024-01-28T17:52:45+5:302024-01-28T17:52:52+5:30
आरोपीने रजिस्ट्रेशन फी, कन्सल्टेशन फी, विजासाठी लागणारी फी अशी वेगवेगळी कारणे देत पैश्यांचा तगादा लावला
पुणे : डेन्मार्कमध्ये मॅनेजर पदावर नोकरी मिळवून देतो असे सांगून एकाची फसवणूक केल्याचा प्रकार वाघोली परिसरात घडला आहे. याबाबत नरेंद्र राघवेंद्र पाटील (वय- ५५, रा. वाघोली) यांनी शनिवारी (दि. २७) पोलिसांना फिर्याद दिली आहे. त्यानुसार तक्रारदार यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला.
डेन्मार्क येथील सीजी जेन्ससन या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये मॅनेजर पद रिक्त असल्याचे सांगितले. तुम्ही तेथे कंटकारण्यास इच्छूक आहात का अशी तक्रारदार यांना विचारणा केली. संमती कळवल्याने आरोपीने रजिस्ट्रेशन फी, कन्सल्टेशन फी, विजासाठी लागणारी फी अशी वेगवेगळी कारणे देत पैश्यांचा तगादा लावला. त्यानंतर तक्रारदार यांची मुलाखत घेऊन बनावट जॉब ऑफर लेटर दिले. मात्र कोणताही जॉब न मिळाल्याने विचारणा केली असता आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आले. एकूण २८ लाख ६९ हजार रुपये भरले तरीसुद्धा नोकरी न मिळाल्याने तक्रारदार यांनी पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक पाटील पुढील तपास करत आहेत.