कोवळ्या जीवाची हत्या करणाऱ्या आईला सक्तमजुरी
By Admin | Published: May 6, 2017 02:28 AM2017-05-06T02:28:59+5:302017-05-06T02:28:59+5:30
मूल नको असल्यामुळे दोन महिन्यांच्या कोवळ्या जीवाला जिन्यावरून खाली फेकून देऊन तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मूल नको असल्यामुळे दोन महिन्यांच्या कोवळ्या जीवाला जिन्यावरून खाली फेकून देऊन तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आईला ५ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश मोहम्मद नासिर सलीम यांनी हा आदेश दिला.
सुषमा विजय पाटेकर (वय २३, रा. निगडी) असे शिक्षा सुनावलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी विजय अनिल पाटेकर (वय ३३) यांनी फिर्याद दिली आहे. मैत्रयी विजय पाटेकर (वय २ महिने) असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुरडीचे नाव आहे. १ जून २०१५ रोजी ही घटना घडली. आरोपीला मूल नको असल्याने तिने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून मुलीला खाली रस्त्यावर फेकून दिले. यामध्ये तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात सरकारी वकील सुनील हांडे यांनी सात साक्षीदार तपासले. खटल्यात पंच, साक्षीदार व वैद्यकीय पुरावा महत्त्वाचा ठरला. न्यायालयाने कलम ३०२ मधून मुक्तता करत ३०४ (२) मध्ये ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.