नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेचे सक्षमीकरण
By admin | Published: January 10, 2017 02:59 AM2017-01-10T02:59:40+5:302017-01-10T02:59:40+5:30
पुढील काळात नोटाबंदीमुळे भारताची अर्थव्यवस्था सक्षम होण्यास मदत होईल. सर्व व्यवहार जाहीर करण्याच्या दृष्टीने नोटाबंदी ही सुरुवात आहे
तळेगाव दाभाडे : पुढील काळात नोटाबंदीमुळे भारताची अर्थव्यवस्था सक्षम होण्यास मदत होईल. सर्व व्यवहार जाहीर करण्याच्या दृष्टीने नोटाबंदी ही सुरुवात आहे, असे मत अर्थतज्ज्ञ विनायक गोविलकर यांनी व्यक्त केले.
येथील श्री गणेश मोफत वाचनालय व ग्रंथालयाच्या वतीने अॅड. दादासाहेब परांजपे व्याख्यानमालेचे आयोजन संस्थेच्या कै. क्षमा अरविंद शहा सभागृहात करण्यात आले. त्यावेळी ह्यबंदी नोटांना, भिंती खोट्यांनाह्ण या विषयावर पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. व्याख्यानमालेचे उद्घाटन नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी सनदी लेखापाल सुनिल खोल्लम होते. यावेळी व्यासपीठावर नगरसेविका मंगल भेगडे, शोभा भेगडे, संध्या भेगडे, वैशाली भेगडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी वाचनालयाच्या वेबसाईटचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गोविलकर यांनी सगळ्यांना समजेल अशा भाषेत नोटाबंदीविषयी सांगितले. ज्यांनी आपले उत्पन्न जाहीर केले नाही त्यांना नोटाबंदीची भीती आहे, असेही ते म्हणाले.
वाचनालयाचे अध्यक्ष दिनेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत दिवेकर यांनी सूत्रसंचालन केले. ग्रंथपाल विनया अत्रे, उपग्रंथपाल मानसी गुळुमकर, ललिता गटणे, जान्हवी देशमुख व हेमाली टेकवडे यांनी संयोजन केले. व्याख्यानमालेस तळेगावकर रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला.(वार्ताहर)