एमआयटीयन्सच्या जल्लोषात रंगला एमपॉवर
By admin | Published: February 8, 2015 12:01 AM2015-02-08T00:01:22+5:302015-02-08T00:01:22+5:30
विजेत्यांचा उत्साह वाढवणारे ‘जय हो’ गाण्याचे आणि नाशिक ढोलाचे पार्श्वसंगीत यांनी एमआयटी महाविद्यालयातील स्वामी विवेकानंद सभागृह दणाणून गेले.
पुणे : एमआयटीयन्सचा जल्लोष, जल्लोषात होणारी पारितोषिकांची बरसात, विजेत्यांचा उत्साह वाढवणारे ‘जय हो’ गाण्याचे आणि नाशिक ढोलाचे पार्श्वसंगीत यांनी एमआयटी महाविद्यालयातील स्वामी विवेकानंद सभागृह दणाणून गेले.
निमित्त होते एमआयटी महाविद्यालय व लोकमत युवा नेक्स्टच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या ‘एमपॉवर २0१५’ चे. याप्रसंगी ‘लोकमत’चे महाव्यवस्थापक मिलन दर्डा, एलाईट लँडमार्क्सचे गजेंद्र पाटील, बँक आॅफ महाराष्ट्रचे विलास रवंदे, एमआयटीच्या संचालिका सायली गणकर व उज्ज्वला बैरागी उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये ७०० महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. एमपॉवर या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. सर्वात जास्त आकर्षण असलेल्या जुगाड या स्पर्धेचा विजेतेपदाचा मान गरवारे महाविद्यालयाच्या नूपुर विग हिने मिळवला. रोलिंग ट्रॉफीचा यंदाचा मानदेखील एमआयटी महाविद्यालयाने पटकावला.
रचना इंटरनॅशनलचे सुजित मुळे या वेळी बोलताना म्हणाले, ‘‘ही आत्ता केवळ एक महाविद्यालयातील स्पर्धा वाटत असली तरी पुढील आयुष्यातील घडामोडींमध्ये आत्ताचे अनुभवच
कामी येतात.’’ (प्रतिनिधी)
द इम्पॅशनड आय- मॉडर्न कॉलेज आॅफ कॉमर्स, उपविजेते- एनआयसीएमएआर
द वूल्फ आॅफ वॉलस्ट्रीट- व्हीआयएम कॉलेज, उपविजेते- मिटसॉम कॉलेज
लेस क्विजरेबल्स- डीएमसीई कॉलेज, उपविजेते- आयएमडीआर
द गॉड फादर- एमआयटी स्कूल आॅफ बिझनेस, उपविजेते- सिंहगड स्कूल आॅफ बिझनेस
इन्वेंटरी मेनिया- एमआयटी स्कूल आॅफ बिझनेस, उपविजेते- इंदिरा स्कूल बिझनेस स्टडीज
एच आर द ट्रान्सफॉर्मर्स- आयएमडीआर, उपविजेते- कावेरी कॉलेज आॅफ आटर््स, सायन्स अँड कॉमर्स
बिड अँड हॅमर- इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, उपविजेते- इंदिरा स्कूल बिझनेस स्टडीज
आयपीएल कुरुक्षेत्र- सिंहगड इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट, उपविजेते- एमआयटी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग
बिंग लाईक टकर- एमआयटी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, उपविजेते-
सिंहगड इन्स्टिट्यूट आॅफ इंटरनॅशनल बिझनेस
शोबिज- सिंहगड स्कूल आॅफ बिझनेस स्टडीज, उपविजेते- इंदिरा कॉलेज
स्टम्प्ड- सिंहगड स्कूल आॅफ बिझनेस, उपविजेते- सूर्यदत्ता कॉलेज
रेज-डोटा- पूना कॉलेज, उपविजेते- एमआयटी श्रीमती सावित्रीबाई फुले पॉलिटेक्निक
रेज काऊंटर स्ट्राईक - मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज आॅफ लॉ, उपविजेते- डी. वाय. पाटील पिंपरी
रेज-पॉकेट टँंक्स- एमआयटी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, उपविजेते- एमआयटी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग
रेज एनएफएस- ट्रिनिटी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, उपविजेते- इंपिरियल कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च
रेज फिफा- एमआयटी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, उपविजेते- एआयएसएसएमएस कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग.
‘बाजी’चा क्रेझ!
‘बाजी’ चित्रपटाचा अभिनेता श्रेयस तळपदे, अभिनेत्री अमृता खानविलकर, अभिनेता जितेंद्र जोशी, दिग्दर्शक सुनील महाजन यांनी ‘एमपॉवर’ ला भेट दिली.
कोणती गोष्ट किंवा वस्तू कधी कामी येईल हे सांगता येत नाही, त्यामुळे कोणालाही तुच्छ लेखू नका.
- श्रेयस तळपदे (अभिनेता)
हा मराठीतील पहिला अॅक्शन चित्रपट असून, तो मनोरंजनात्मकदेखील आहे.
- जितेंद्र जोशी (अभिनेता)