देशवासीयांच्या राख्यांमुळे सैनिकांना प्रोत्साहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:16 AM2021-08-18T04:16:07+5:302021-08-18T04:16:07+5:30
पुणे : मी १५ वर्षे जम्मू-काश्मीरमध्ये काम केले आहे. सैन्य दलात देखील सण साजरे केले जातात. देशवासीयांनी पाठविलेल्या आपुलकीच्या ...
पुणे : मी १५ वर्षे जम्मू-काश्मीरमध्ये काम केले आहे. सैन्य दलात देखील सण साजरे केले जातात. देशवासीयांनी पाठविलेल्या आपुलकीच्या राख्या आणि पत्रे जेव्हा सैनिकांपर्यंत पोहोचतात, तेव्हा त्यांना प्रोत्साहन मिळते. परिवाराबरोबरच संपूर्ण देश आपल्यामागे उभा असल्याचे त्यांना वाटत असते, असे मत निवृत्त कर्नल विक्रम पत्की यांनी व्यक्त केले.
‘आम्ही पुणेकर’ या संस्थेच्या वतीने जम्मू आणि काश्मीरमधील सैनिकांसाठी दिव्यांगांनी बनवलेल्या राख्या आणि चॉकलेट राख्या रवाना करण्यात आल्या. राख्यांचे पूजन दृष्टीहीन मुले व विक्रम पत्की यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आम्ही पुणेकर संस्थेचे हेमंत जाधव, प्रणव पवार, सुभाष सुर्र्वे, अखिल झांजले, विक्रम मूर्ती, डॉ. स्वप्निल शेठ, दृष्टीहीन रामदास लढे, राजेंद्र तरगे, पवन नांगरे, श्वेता जाधव, राधिका कोरे, स्नेहल अनिता, बाळासाहेब बांगर, सिध्दी राऊत, सचिन राऊत, उमेश सोनेरी आदी उपस्थित होते.
हेमंत जाधव म्हणाले, ‘जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टर, डोडा, रियासीसह विविध भागांतील सैनिकांना या राख्या आम्ही बांधणार आहोत. नेहमीच्या राख्यांपेक्षा चॉकलेटच्या राख्या यंदा जवानांसाठी तयार करण्यात आल्या आहेत. या उपक्रमासाठी जम्मू-काश्मीरमधील जनरल झोरावर सिंग ट्रस्टचे सहकार्य लाभले आहे.’