जेजुरीत अतिक्रमणे हटविली
By admin | Published: March 21, 2017 05:06 AM2017-03-21T05:06:28+5:302017-03-21T05:06:28+5:30
महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्याव जेजुरी गडाच्या पायरी मार्गावर मोठ्या प्रमाणात दुकानाची अतिक्रमणे झाली होती.
जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्याव जेजुरी गडाच्या पायरी मार्गावर मोठ्या प्रमाणात दुकानाची अतिक्रमणे झाली होती. सोमवती यात्रेच्या अनुषंगाने ही अतिक्रमणे श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी व जेजुरी पोलीस स्टेशन यांनी आज (दि. २०) रोजी हटविण्यास सुरुवात केली. दि. १८ रोजी देवसंस्थानच्या विश्वस्त मंडळाची बैठक झाली होती.
बैठकीत खंडोबा देवाच्या दर्शनासाठी भाविकांची संख्या सतत वाढत आहे. यात्रा काळात पायरी मार्गावरील अतिक्रमणामुळे गडावर जाण्यासाठी अडथळे निर्माण होत होते. या संदर्भातील भाविकांच्या तक्रारी तसेच सोमवारी सोमवती भरण्याची शक्यता आहे. या यात्रेला गर्दीमुळे कोणताही चेंगराचेंगरी सारखा प्रकार होवू नये यासाठी पायरी मार्गावरील अतिक्रमणे काढण्याचा निर्णय या बैठकीत झाला. या वेळी प्रमुख विश्वस्त संदीप घोणे, विश्वस्त अॅड. किशोर म्हस्के, अॅड. दशरथ घोरपडे, सुधीर गोडसे, पदसिद्ध विश्वस्त व नगरध्यक्षा वीना सोनवणे उपस्थित होते.