अतिक्रमणे हटविली! बाभुळगावला वन विभागाने शेतीतील, तर राजगुरुनगरला रस्त्यातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 11:53 PM2018-08-28T23:53:45+5:302018-08-28T23:54:11+5:30

जवळपास १२० वन परिक्षेत्र अधिकारी, कर्मचारी व राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी तैनात करून पुणे वन विभागाने सलग आठ तास कारवाई

Encroach was deleted! The forest department of Babulgawa is in agriculture and in the road to Rajgurunagar | अतिक्रमणे हटविली! बाभुळगावला वन विभागाने शेतीतील, तर राजगुरुनगरला रस्त्यातील

अतिक्रमणे हटविली! बाभुळगावला वन विभागाने शेतीतील, तर राजगुरुनगरला रस्त्यातील

Next

बिजवडी : जवळपास १२० वन परिक्षेत्र अधिकारी, कर्मचारी व राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी तैनात करून पुणे वन विभागाने सलग आठ तास कारवाई करत १५ जेसीबी यंत्रांच्या साहाय्याने इंदापूर तालुक्यातील बाभुळगावच्या हद्दीतील ६२ एकर क्षेत्रातील शेतीचे अतिक्रमण काढून टाकले.

पुण्याचे सहायक वनसंरक्षक एम. बी. तेलंग, पुणे प्रादेशिकचे मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, सहायक वनसंरक्षक वैभव भालेकर यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली इंदापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, पौडचे वनपरिक्षेत्र अधिकारी पोपट कापसे, बारामतीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. सुपेकर, दौंडचे वनपरिक्षेत्र अधिकारी हजारे, इंदापूरचे वनपाल पी. डी. चौधरी, वनरक्षक शीतल बागल यांच्यासह इंदापूर, बारामती, दौंड, पौड व इतर भागांतील वनकर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. या संदर्भात माहिती देताना इंदापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी सांगितले की, बाभुळगावच्या हद्दीत वेगवेगळ्या जमीन गट क्रमांकामध्ये वनविभागाचे १६७ एकर क्षेत्र आहे.
तीन महिन्यांपूर्वी वनजमिनीचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये वनविभागाच्या एकूण क्षेत्रापैकी ६२ एकर जमिनीवर शेजारी असणाºया शेतकºयांनी अतिक्रमण केल्याचे या सर्वेक्षणात आढळून आले. अतिक्रमण हटवलेल्या ठिकाणी वनविभागाने हद्दीनिश्चित केल्या आहेत. तेथे संरक्षक भिंत अथवा कुंपण घालण्यात येणार आहे. आतमध्ये वृक्षलागवड करण्यात येणार आहे, अशी माहिती देऊन काळे यांनी वनक्षेत्रात अतिक्रमण केल्यास तो वनगुन्हा ठरत असल्याने, कोणीही अतिक्रमण करू नये,असे आवाहन केले आहे. पत्रकारांना राज्य राखीव दलाच्या कर्मचाºयांनी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला.

राजगुरुनगर : शहराच्या हद्दीतून जाणाºया शिरूर- भीमाशंकर रस्त्यावरील अतिक्रमणे नेहमीप्रमाणे मंगळवारी (दि.२८) पुन्हा एकदा औपचारिकता म्हणून हटविण्यात आली. या कारवाईत नायब तहसीलदार राजेंद्र जाधव, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, बाधंकाम विभागाचे अभियंता भास्कर क्षीरसागर, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी आदिंसह नगरपरिषदेचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
खेड उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार गेल्या वर्षीच्या आक्टोबर महिन्यात शहरातील सर्व अतिक्रमणावर जोरदार हातोडा मारला होता. त्यानंतर पुन्हा वाडा रस्त्यावर व पाबळ रस्त्यावर आणि पुणे-नाशिक महामार्गावरील व्यवसायिकांनी आपली दुकाने थाटली. त्यातच रक्षाबंधन आणि गणेशोत्सवानिमित्ताने अनेकांनी आपापल्या पुढाºयांच्या छुप्या पाठिंब्यावर पत्र्याचे गाळे उभारुन कहर केल्याने सर्वत्र प्रशासनावरच टिकेची झोड उठून आरोप होऊ लागले होते. अखेर प्रशासनाने औपचारिकता म्हणून अतिक्रमण कारवाईचा देखावा केला. अतिक्रमणे हटवताना थेट कारवाई न करता व्यावसायिकांना आपले साहित्य आणि मालाचे नुकसान न करता हटविण्यात येऊन रस्ते मोकळे केल्यामुळे नागरिकांनी मोकळा श्वास घेतले. या कारवाईचे स्वागत केले आहे.

वनकायद्यानुसार हा वनगुन्हा असल्याने संबंधितांना नोटिसा पाठवून, ते कोणत्या आधारे जमिनी कसत आहेत, यासंदर्भात कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले होते. ही कागदपत्रे सादर केली गेली नाहीत. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे काळे यांनी स्पष्ट केले.
या कारवाईत अतिक्रमण करून लावलेली उसाची पिके अक्षरश: गवतासारखी मुळासह उखडून टाकण्यात आली.
 

Web Title: Encroach was deleted! The forest department of Babulgawa is in agriculture and in the road to Rajgurunagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.