अनधिकृत व्यावसायिकांवर अतिक्रमण कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:12 AM2021-08-29T04:12:38+5:302021-08-29T04:12:38+5:30

पुणे : शिवाजीनगर-घोले रोड क्षेत्रीय कार्यालयांच्या क्षेत्रातील सार्वजनिक रस्ते, पदपथांवरील अतिक्रमणांसह, व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण व बांधकाम शुक्रवारी महापालिकेच्या कारवाई ...

Encroachment action on unauthorized traders | अनधिकृत व्यावसायिकांवर अतिक्रमण कारवाई

अनधिकृत व्यावसायिकांवर अतिक्रमण कारवाई

googlenewsNext

पुणे : शिवाजीनगर-घोले रोड क्षेत्रीय कार्यालयांच्या क्षेत्रातील सार्वजनिक रस्ते, पदपथांवरील अतिक्रमणांसह, व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण व बांधकाम शुक्रवारी महापालिकेच्या कारवाई करून अतिक्रमण विभागाने हटविले़ या कारवाईत एकूण ४५ ठिकाणी कारवाई करण्यात आली असल्याची माहिती उपआयुक्त माधव जगताप यांनी दिली़

लेबर आॅफिस, शासकीय दूध डेअरी, पुणे-मुंबई रोड, भोसलेनगर, एफ. सी़ रोड, डेक्कन परिसरात ही कारवाई करण्यात आली़ यात ११ स्टॉल, ५ हातगाड्या, ५ पथारी व्यावसायिक, सिलिंडर वापर करणा-या ५ जणांसह इतर १९ अशा ४५ जणांवर कारवाई करण्यात आली़

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने दिलेल्या परवान्यांना व फेरीवाला प्रमाणपत्रमधील अटी व शर्तींचा भंग करणा-या व्यावसायिकांवर ही कारवाई करण्यात आली़ यामध्ये स्वत: व्यवसाय न करता पोटभाडेकरू ठेवणे, मान्य जागेवर व्यवसाय न करणे, गॅस सिलिंडर, स्टोव्ह वापर करणे तसेच पदपथ व रस्त्यांवर व्यवसाय करणा-या ४५ जणांचा समावेश आहे़

--------------------

फोटो मेल केला आहे़

Web Title: Encroachment action on unauthorized traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.