भोर शहरातील अतिक्रमण मोहीम थंडावली, वाहतूककोंडी पुन्हा जैसे थे, नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:10 AM2021-04-01T04:10:26+5:302021-04-01T04:10:26+5:30
नागरिकांच्या मागणीचा विचार करून उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी नगरपालिका व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत स्वता पुढाकार घेऊन ...
नागरिकांच्या मागणीचा विचार करून उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी नगरपालिका व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत स्वता पुढाकार घेऊन २१ जानेवारीला अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली होती. सदर मोहीम तहसीलदार अजित पाटील नगरपलिकेचे मुख्यधिकारी विजयकुमार थोरात, नगरपालिका व पोलीस कर्मचारी तसेच अधिकारी व सहभागी होऊन सलग सहा दिवस कारवाई करून रस्त्यावरील विविध प्रकारचे साहित्य जप्त केले होते. त्यानंतर नगरपलिकेकडून शहरातील हद्द निश्चित करुन रस्त्यावर आलेल्या अतिक्रमणांना नोटिसा देऊन स्वत:हून अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर मंगळवार पेठेतील अनेकांनी आपली अतिक्रमणे काढून घेतली होती. त्यामुळे काही काळ भोर शहरातील वाहतूक सुरळीत झाली होती.
दरम्यान, मागील एक दीड महिन्यापासून अतिक्रमण मोहीम थंडावल्याने शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात टपऱ्या शेडची अतिक्रमणे सुरु झाली आहेत. वाहने रस्त्यावरच लावली जात आहेत. त्यामुळे वाहतूक कोडी जैसे थे झाली असून शहरासह बाहेरून येणाऱ्या नागरिकांना वाहतूककोंडीच्या ञासाला सामोरे जावे लागत आहे. याकडे भोर नगरपलिका व भोर पोलीस यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शहरात वाढत असलेली अतिक्रमणे रस्त्यावर लावलेल्या गाड्या काढून थंडावलेली अतिक्रमण मोहीम पुन्हा सुरु करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. यामुळे धुरांच्या वासात गुदमरलेले शहरातील लोक मोकळा श्वास घेऊ शकतील.
वेताळ पेठ येथील व्यावसायिक तर दुरुस्तीला आलेल्या गाड्या भर रस्त्यावर लावून दुरुस्ती केली जात आहे. याबाबत भोर नगरपालिका प्रशासनाला वारंवार सांगूनही दुर्लक्ष होत आहे. यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले असून नगरपलिका प्रशासनाच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत.
महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वादात रामबाग रस्त्यावरील अतिक्रमणे वाढली
भोर शहरातील चकलांबा ते महाड नाका दरम्यानचा रस्ता वर्ग प्राधिकरणातकडे हस्तांतर झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावर दुकान हॉटेल्स इतर अतिक्रमणे वाढत चालली आहेत. यामुळे वाहतूककोंडी होत आहे. विशेषतः चौपाटी परिसरातील सतत वाहतूककोंडी होते. अतिक्रमणांवर कारवाई कोणी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या वादात येथील कारवाई रखडली आहे. यामुळे महामार्ग प्राधिकरणाने याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी शहरातील नागरिक करत आहेत.
रस्त्यावर वाहने यामुळे वाहतूककोंडी फोटो