PMC | अतिक्रमणांविरोधात कारवाई करताना पुणे महापालिकेच्या अतिक्रमण निरीक्षकाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 08:48 PM2023-03-20T20:48:45+5:302023-03-20T20:51:08+5:30

वारजे पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला...

encroachment inspector of Pune Municipal Corporation was beaten while taking action against encroachments pmc | PMC | अतिक्रमणांविरोधात कारवाई करताना पुणे महापालिकेच्या अतिक्रमण निरीक्षकाला मारहाण

PMC | अतिक्रमणांविरोधात कारवाई करताना पुणे महापालिकेच्या अतिक्रमण निरीक्षकाला मारहाण

googlenewsNext

पुणे : शहरात कर्वेनगर पूल ते गणपती माथा यादरम्यान अतिक्रमणाची कारवाई सुरू आहे. त्यात रविवार सुटीचा दिवस असतानाही तुम्ही कारवाई कशी करता, असा सवाल करून महापालिकेच्या अतिक्रमण निरीक्षक व सहायकाला मारहाण केल्याची घटना घडली. त्यानुसार वारजे पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील अतिक्रमणांची व अनधिकृत व्यवसायांची संख्या वाढत असतानाच अतिक्रमणांविरोधात कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचे प्रकारही वाढले आहेत. एनडीए मैदानाजवळ कारवाई सुरू असताना अनधिकृत विक्रेत्यांकडून महापालिकेचे अतिक्रमण निरीक्षक अंकुश बादाड यांना मारहाण करण्यात आली.

याप्रकरणी बादाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नवनाथ वांजळे, रोहन माळशिखरे, सुभाष बोडके, गणेश हुंबरे यांच्यासह इतर चार अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘परिमंडळ तीन’मध्ये बादाड अतिक्रमण निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. रविवारी बादाड आपल्याकडील पथकासह महापालिकेच्या वाहनाने वारजे येथील गणपतीमाथा परिसरात पदपथ व रहदारीच्या रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एनडीए मैदानाजवळ रहदारीच्या रस्त्यावर काही भाजी व फळविक्रेत्यांनी रस्त्यावरच विक्री सुरू ठेवल्याने बादाड यांनी त्यांना क्रेट व पथारी काढण्यास सांगितले. मात्र, विक्रेत्यांनी त्यास नकार दिला.

त्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी क्रेट व पथारी उचलण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी ‘रविवार, सुटीचा दिवस असल्याने तुम्ही कारवाई कशी करता,’ असा सवाल करून त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर बादाड वाहनातून आपल्या मोबाइलद्वारे शूटिंग करीत असताना या अनधिकृत विक्रेत्यांनी त्यांना वाहनातून बाहेर खेचले व हाताने व बांबूने मारहाण केली. त्यानंतर बादाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी तेथून सुटका करून घेऊन वारजे पोलिस ठाणे गाठले. बादाड व नीलेश सांबरे यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले.

Web Title: encroachment inspector of Pune Municipal Corporation was beaten while taking action against encroachments pmc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.