नायगावातील अतिक्रमण एका दिवसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:10 AM2020-12-29T04:10:48+5:302020-12-29T04:10:48+5:30

कुंजीरवाडी ग्रामपंचायत प्रशासनाने सेवा रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या सर्व व्यवासायिकांवर कार्यवाही केल्यामुळे येथील रहदारी कमी होण्यास मदत झालेली आहे.तसेच पोलीस ...

Encroachment in Naigaon in one day | नायगावातील अतिक्रमण एका दिवसात

नायगावातील अतिक्रमण एका दिवसात

Next

कुंजीरवाडी ग्रामपंचायत प्रशासनाने सेवा रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या सर्व व्यवासायिकांवर कार्यवाही केल्यामुळे येथील रहदारी कमी होण्यास मदत झालेली आहे.तसेच पोलीस प्रशासनला याबाबत माहिती विचारली असता येत्या दोन दिवसात रहदारी नियंत्रणात आणली जाईल व बेशिस्त वाहन चालकांवर कार्यवाही केली जाईल असे सांगण्यात आले. त्याचसोबत महामार्गालगत असणाऱ्या अनधिकृत बांधकामांविषयी पी.एम.आर.डी. ए विभागाशी संपर्क केले असता समजले की हा संपूर्ण भाग भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण(एन.एच.ए.आय) हस्तांतरित केलेला असून पी.एम.आर.डी.ए विभागाकडे यासंदर्भात कोणतेच अधिकार उरलेले नाही. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण(एन.एच.ए.आय) विभागाशी संपर्क केला असता मार्च दरम्यान आमच्याकडे यासंदर्भात अधिकार आलेले असून आम्ही येत्या काही दिवसात महामार्ग हद्दीत झालेल्या अतिक्रमनावर कार्यवाही करणार आहोत असे आश्वासन दिले.

--

चौकट

कोरोनाचा काळ सुरू असल्याने अनेक लोकांचे रोजगार बुडाले आहेत त्यामुळे अनेक लोक रस्त्याच्या कडेला विविध व्यवसाय करू लागले आहेत.हातविक्रेते,भाजी विक्रेते यांच्याकडून काही जागामालक काहीही संबंध नसतानाही रस्त्याच्या कडेला बसण्यासाठी दिवसाला दोनशे ते पाचशे रुपये भाडे आकारत असून या व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने सुरक्षित जागा उपलब्ध करून द्यावी.

--

कोट

प्रकाश गळवे

ग्रामसेवक,कुंजीरवाडी

संबंधित व्यावसायिकांना आम्ही होणाऱ्या परिणामांची माहिती दिलेली असून महामार्गालगत होणाऱ्या अपघातांचे परिणाम त्यांनाही भोगावे लागतील त्यामुळे त्यांना त्या जागेवर बसण्यास व व्यवसाय करण्यास मज्जाव केलेला असून संबंधित व्यावसायिकांनी सुरक्षित ठिकाणी आपले व्यवसाय करावेत अशी विनंती आहे.लवकरच यासाठी सुरक्षित जागेची सोय करण्यात येईल.

---

फोटो 2

Web Title: Encroachment in Naigaon in one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.