सारसबागेतील खाण्या-पिण्याच्या चंगळीवर अतिक्रमणचा हातोडा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 02:00 PM2022-03-26T14:00:00+5:302022-03-26T14:00:01+5:30

येथील कारवाईत अनधिकृत शेड, टेबल, खुर्च्या, बोर्ड आदी दहा ट्रक साहित्य जप्त

encroachment on the food and drink near sarasbaug removed by pmc | सारसबागेतील खाण्या-पिण्याच्या चंगळीवर अतिक्रमणचा हातोडा

सारसबागेतील खाण्या-पिण्याच्या चंगळीवर अतिक्रमणचा हातोडा

googlenewsNext

पुणे : प्रशासकराज सुरू झाल्यापासून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरात अनधिकृत बांधकाम, पदपथ, रस्त्यावरील अतिक्रमणांवर जोरदार कारवाई सुरू केली आहे. गुरुवारी सारसबाग चौपाटीवरही या कारवाईत हातोडा पडला असून, येथील कारवाईत अनधिकृत शेड, टेबल, खुर्च्या, बोर्ड आदी दहा ट्रक साहित्य जप्त करण्यात आले आहे.

शहरातील रस्त्याच्या कडेला, पदपथावर असलेल्या अतिक्रमणांवर गेल्या काही दिवसांपासून मोठी कारवाई होत असून, महापालिका सभागृहाची मुदत संपल्याने आता कुठलाही राजकीय दबाव नसल्याने या कारवाईने जोर धरला आहे.

या कारवाईअंतर्गत गुरुवारी सकाळी अतिक्रमण विभागाने सारसबाग येथील खाऊगल्ली व चौपाटीवर कारवाई केली. या कारवाईत अनधिकृतपणे उभारलेले स्टॉलसमोरील शेड, फ्लेक्सच्या पाठीमागे उभारलेली दुमजली दुकाने उद्ध्वस्त केली, तसेच येथील टेबल, खुर्च्या, बोर्ड, काउंटर, गॅस शेगड्या, आदी दहा ट्रक साहित्य जप्त केले.

या कारवाईत ९० बिगारी, ४ जेसीबी, पोलीस आदींनी सहभाग घेतला होता. या कारवाईत अतिक्रमण विभागाने केवळ स्टॉलवर कारवाई केली असून, येथील अतिक्रमण केलेल्या पाळण्यांवरही कारवाई केली नसल्याचे सांगत येथील स्टॉलधारकांनी ही कारवाई करताना पक्षपातीपणा करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, आज स्वीट इंडिया चौक, मुंढवा ब्रीज लोहगाव परिसर, औंध येथील ब्रेमन चौक ते आंबेडकर चौक, मेडी पॉइंट ते पाषाण सुस गाव ते सुस रस्ता, सुस खिंड ते सुस गाव, धनकवडीच्या हद्दीत गजानन मठ चौक ते विणकर सभागृह चौक, कात्रज दूध डेअरी मंत्री चौक ते भारती विद्यापीठ बॅकगेट, ट्रेझर पार्क ते ई-लर्निंग शाळा चौक, हडपसर परिसरात हांडेवाडी रोड, तर कसबा विश्रामबागच्या हद्दीत केळकर रोड, कुमठेकर रोड, सिटी पोस्ट चौक, अलका टॉकीज चौक, शनिपार चौक, चितळे बंधू मिठाईवाले, तुळशीबाग, बाबू गेनू चौक, जिलब्या मारुती चौक, कोतवाल चावडी, टिळक रोड, टिळक स्मारक ते लक्ष्मी रस्ता आदी ठिकाणी अतिक्रमण कारवाई करण्यात आली.

Web Title: encroachment on the food and drink near sarasbaug removed by pmc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.