भवानी पेठेतील पीएमसी कॉलनीला अतिक्रमणाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:10 AM2021-04-11T04:10:12+5:302021-04-11T04:10:12+5:30
विशेष म्हणजे याभागातील लोकप्रतिनिधीनेही या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभाग, अतिक्रमण विभागाचा निष्काळजीपणा यासर्व गोष्टीला कारण ...
विशेष म्हणजे याभागातील लोकप्रतिनिधीनेही या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभाग, अतिक्रमण विभागाचा निष्काळजीपणा यासर्व गोष्टीला कारण काय? असा प्रश्न येथील नागरिक करीत आहेत. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू रस्त्यापासून बाफना ऑटोमोबाईल्सकडून पीएमसी कॉलनीकडे जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर दोन्ही बाजूने पार्किंग होत असते. नागझरीच्या पुलाजवळ रस्त्याच्याकडेला वर्षानुवर्षे ठेवण्यात येत असलेले भंगार समान असते. फ्रीज कपाट तोडून त्यातील कचरा सर्वत्र पसरलेला असतो. पुलाच्या पुढे कॉलनीच्या बाहेर असलेल्या भंगार दुकानातील माल कॉलनीच्या भिंतीला लावून ठेवलेले असतो. कॉलनीच्या मुख्य दरवाज्याला लागूनच हातगाड्या उभ्या करण्यात येतात. मध्येच असलेले वृत्तपत्र नसलेले पेपरचे वाचनालय आहे. यासर्व गोष्टींमुळे परिसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, अशी तक्रार येथील काही नागरिक तसेच येथील सोसायट्यांमधील रहिवाशांनी केली आहे. यापरिसरतील अतिक्रमण हटवून येथील स्वछता त्वरित करून घ्यावी, अशी मागणी त्रस्त नागरीक करीत आहे.
चौकट
कोणी तरी रात्रीच्या वेळी याठिकाणी कचरा व राडारोडा टाकत आहे. कोण टाकतो हे माहीत नाही. - एस मुजावर आरोग्य निरीक्षक, जनरल अरणकुमार वैद्य क्षेत्रीय कार्यालय