सातारा रस्त्यावर अतिक्रमण हटविले

By admin | Published: June 2, 2017 02:39 AM2017-06-02T02:39:38+5:302017-06-02T02:39:38+5:30

पुणे-सातारा रस्त्यावर कात्रज डेअरीच्या बाजूला कामठे गॅरेजसमोरील अतिक्रमण, पथ विभाग, मालमत्ता भूमी जिंदगी विभाग

Encroachment removed on Satara road | सातारा रस्त्यावर अतिक्रमण हटविले

सातारा रस्त्यावर अतिक्रमण हटविले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कात्रज : पुणे-सातारा रस्त्यावर कात्रज डेअरीच्या बाजूला कामठे गॅरेजसमोरील अतिक्रमण, पथ विभाग, मालमत्ता भूमी जिंदगी विभाग यांनी सयुक्तपणे केलेल्या कारवाईमुळे रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुणे-सातारा महामार्गावर राजीव गांधी प्राणिसंग्रहालयासमोर ‘स्वारगेट ते कात्रज’ या रस्त्यावरील बीआरटी, सायकल ट्रॅक, पदपथ व रस्तारुंदीकरण काम सुरू आहे. या वेळी पथ विभागाचे उप अभियंता अर्धापुरे, राहुल सोरटे, बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता डी. एन. जगताप, भूमी जिंदगीचे रमेश कांबळे आदींसह पालिका अधिकारी या वेळी उपस्थित होते.
सुमारे १२०१ चौ. मी. अतिक्रमण मोकळे करण्यात आले आहे; तसेच पुढील १८०० चौ. मी. जागेसंदर्भात विषय न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे कारवाई केली नाही, असे या वेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.
ज्या जागेवर कारवाई करण्यात आलेली आहे, त्या जागेचे मालक हनुमंत कामठे व रमेश कदम यांनी सांगितले की, ही जागा अजून आम्ही पालिकेला सुपूर्द केलेली नाही. याचा विषय न्यायालयात चालू असताना ही कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाला आहे.

२४ एप्रिल रोजी कात्रजच्या विविध प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले होते. त्यापैकी कामठे गॅरेजच्या समोरील जागा हस्तांतरण करून रस्तारुंदीकरण करावे, ही प्रमुख मागणी आयुक्तांकडे केली होती. या समस्येबाबत पालिका पथ विभाग, भूमी जिंदगी या अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा घडून आणला. आयुक्तांनी घटनेचे गांभीर्य ओळखून कारवाईचे आदेश दिल्यामुळे रस्तारुंदीकरणाचा विषय मार्गी लागला आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरलेल्या कात्रजकरांना न्याय मिळाल्याचे समाधान वाटते.
- अमृता बाबर, नगरसेविका

‘स्वारगेट ते कात्रज’ या रस्त्याचे काम मार्गी लागावे म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून मनपा अधिकारी व जागामालक यांच्यात समन्वय घडून आणण्यासाठी बैठक घेतल्या आहेत; तसेच हा विषय २० मेच्या सर्वसाधारण सभेत घेतला होता. १९९६ मध्ये ताब्यात आलेल्या जागा ताब्यात घेण्यास उशीर केला. हा विषय शहराच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या रस्त्याचा आहे. त्यामुळे सामोपचाराने मिटवण्याची आवश्यकता आहे.- वसंत मोरे, नगरसेवक

पुणे शहर व कात्रज उपनगराला जोडणारा महत्त्वाचा रस्ता असून, तो पूर्णपणे विकसित व्हावा, यासाठी संबंधित विभागाशी पत्र व्यवहार केला आहे. पालिका अधिकारी व जागामालक यांनी एकत्र बसून विषय मार्गी लावावा. जागामालकाच्या उर्वरित जागेच्या विकसनासाठी सहकार्य करू, त्यामुळे मात्र जागामालकांनी नागरिकांचे हित लक्षात घेता, न्यायालयाचा आधार घेऊन विकासाच्या आड येऊ नये.
- युवराज बेलदरे, नगरसेवक

Web Title: Encroachment removed on Satara road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.