अतिक्रमण उपायुक्तांना धमकावणाऱ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 01:16 AM2019-01-12T01:16:02+5:302019-01-12T01:16:20+5:30

कारवाई केल्याचा राग : अतिक्रमण काढत असताना धक्काबुक्की

Encroachment is threatened by those who threaten the Deputy Commissioner | अतिक्रमण उपायुक्तांना धमकावणाऱ्यांना अटक

अतिक्रमण उपायुक्तांना धमकावणाऱ्यांना अटक

Next

पुणे : अतिक्रमण कारवाई केली म्हणून अतिक्रमण उपायुक्त माधव जगताप यांना ‘बघून घेऊ’ अशी धमकी देणाºया तिघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. महापालिकेमधील पहिल्या मजल्यावर हा प्रकार घडला. मोहंमद हुसेन इस्माईल शेख (वय ५८, हडपसर), महेंद्र अशोक रसाळ (वय ३६ रा. हडपसर) व एका ज्येष्ठ नागरिकाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे.

फिर्यादी माधव जगताप (वय ४७, रा. सदाशिव पेठ) हे महापालिकेत अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागात उपायुक्त आहेत. त्यांनी बुधवारी हडपसर येथील सासवड रस्त्यालगत असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई केली होती. याचा जाब विचारण्यासाठी आरोपी गुरुवारी दुपारी त्यांच्या कार्यालयात आले होते. त्यांनी कार्यालयात येऊन आरडाओरडा करीत जगताप यांना कार्यालयातून बाहेर पडण्यास मज्जाव केला. यानंतर त्यांना बघून घेण्याची धमकी दिली. त्यामुळे आरोपींवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

फिर्यादी विश्वनाथ बोटे (वय २७) हे महापालिकेच्या अतिक्रमण विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून काम करतात. ते महापालिकेच्या पथकासह पुणे-सासवड रस्त्यालगत फुरसुंगी येथे अतिक्रमण काढण्यासाठी गेले होते. त्या वेळी बेकायदेशीर स्टॉल व हातगाडीवर कारवाई करण्यात आली. तेव्हा आरोपीने त्यांच्या सरकारी गाडीला त्याची कार आडवी लावली. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या सहकाºयांना शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी दिली. तसेच, हाताने त्यांना धक्काबुक्की करीत इतरांना चिथावणी देत ‘यांच्या गाडीला गाड्या आडव्या लावा; हे इथून जातातच कसे ते बघू,’ असे धमकावले.

आरपीआय कार्यकर्ता अटक
अतिक्रमण काढत असताना महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याला
धमकी देऊन धक्काबुक्की करण्यात आली. ही घटना बुधवारी फुरसुंगी येथे घडली.
याप्रकरणी हडपसर पोलिसांनी सूरज गायकवाड (वय २५, रा. हडपसर) याला अटक केली आहे. तर, त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सूरज गायकवाड हा आरपीआयचा कार्यकर्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Encroachment is threatened by those who threaten the Deputy Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.