काँग्रेस, राष्ट्रवादीचे दिवस संपुष्टात, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:15 AM2017-09-19T00:15:41+5:302017-09-19T00:15:44+5:30
‘‘मागील ७० वर्षांपासून देशाला लुटणा-या काँग्रेस व राष्ट्रवादीचे दिवस आता संपले आहेत. मात्र तरीही अच्छे दिन आलेले नाहीत. देशात सध्या भाजपा वगळता दुसरा समर्थ पर्याय दिसत नसला तरी राज्यात मात्र, शिवसेना हाच पर्याय सर्वसामान्य जनतेला दिसतोय,’’ असे प्रतिपादन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केले.
यवत : ‘‘मागील ७० वर्षांपासून देशाला लुटणा-या काँग्रेस व राष्ट्रवादीचे दिवस आता संपले आहेत. मात्र तरीही अच्छे दिन आलेले नाहीत. देशात सध्या भाजपा वगळता दुसरा समर्थ पर्याय दिसत नसला तरी राज्यात मात्र, शिवसेना हाच पर्याय सर्वसामान्य जनतेला दिसतोय,’’ असे प्रतिपादन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केले.
यवत (ता.दौंड) येथे शिवसेनेच्या आठ शाखांचे उद्घाटन राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित सभेत शिवतारे बोलत होते. शिवतारे म्हणाले, दौंड तालुक्यातील जनता हुशार आहे. मात्र बारामतीकरांनी तालुक्याल जनतेचा बुद्धिभेद करण्याचे काम करत तिसरा पर्याय निर्माण होऊ दिला नाही.
राष्ट्रवादीने दौंड तालुक्यात मागील पन्नास वर्षात नुसत्या कुरकुंभ मोरीवर राजकारण केले. मात्र अद्याप देखील मोरी झाली नाही.
या वेळी संपर्कप्रमुख सत्यवान उभे, जिल्हा प्रमुख बाबासाहेब धुमाळ, जिल्हा उपप्रमुख राजेंद्र खट्टी, युवा नेते महेश पासलकर यांची मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख शरदचंद्र सूर्यवंशी, अनिल सोनवणे, दौंडच्या उपनगराध्यक्षा हेमलता परदेशी, नगरसेविका अनिता दळवी, राजाभाऊ शेळके, सदानंद लकडे, छाया जगताप उपस्थित होते. या कार्यक्रमात यवतचे माजी सरपंच श्याम शेंडगे, अशोक दोरगे व परिसरातील आदी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.