मे अखेर शहरात साडेदहा लाख जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:09 AM2021-06-01T04:09:46+5:302021-06-01T04:09:46+5:30
पुणे : लसीकरणात पुणे शहराने २० मे नंतर मोठी आघाडी घेतली असून, यात खासगी रुग्णालयांमध्ये होणाऱ्या लसीकरणाचा मोठा हातभार ...
पुणे : लसीकरणात पुणे शहराने २० मे नंतर मोठी आघाडी घेतली असून, यात खासगी रुग्णालयांमध्ये होणाऱ्या लसीकरणाचा मोठा हातभार लागला आहे़ यामुळे शहरात ३१ मे पर्यंत १० लाख ५५ हजार ५०६ जणांचे लसीकरण झाले आहे़ यात २ लाख ५७ हजार ३०८ जणांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाले आहेत, तर ७ लाख ९८ हजार १९८ जणांना लसीचा अद्याप दुसरा डोस मिळण्याची प्रतीक्षा आहे़
पुणे महापालिकेकडील आकडेवारीनुसार, उशिरा का होईना सुरू झालेल्या १८ ते ४४ या वयोगटातील लसीकरणाला मध्यंतरी ब्रेक लागला असला तरी खासगी रुग्णालयांमधील लसीकरणाने त्याला आता उभारी दिली आहे़ परिणामी आजअखेर या वयोगटातील ७७ हजार ९६० जणांना लसीचा पहिला डोस देता आला आहे़
------------
शहरातील ३१ मे अखेरचे एकूण लसीकरण
वर्ग पहिला डोस दुसरा डोस
आरोग्य कर्मचारी ६०, १७५ ४६,२७९
फ्रंटलाईन वर्क र ७०,८६९ २५,५०६
ज्येष्ठ नागरिक २,८५,१६५ १,३१,६४७
४५ ते ५९ वयोगट ३,०४,०२९ ५३,८६९
१८ ते ४४ वयोगट ७७,९६० ७
----------------------------------