Pune : पत्नी, मुलाचा खून करून पतीची आत्महत्या; सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी घेतलेल्या पैशांनी केला घात

By विवेक भुसे | Published: March 16, 2023 10:57 AM2023-03-16T10:57:13+5:302023-03-16T11:02:27+5:30

आर्थिक विवंचनेतूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तपासात पुढे आले आहे.

end of life of husband by killing wife, son in pune | Pune : पत्नी, मुलाचा खून करून पतीची आत्महत्या; सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी घेतलेल्या पैशांनी केला घात

Pune : पत्नी, मुलाचा खून करून पतीची आत्महत्या; सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी घेतलेल्या पैशांनी केला घात

googlenewsNext

पुणे : संगणक अभियंत्याने माहिती तंत्रज्ञान कंपनीतील चांगली नोकरी सोडून ऑनलाईन भाजी विक्रीचा व्यवसाय सुरु करण्याचे ठरविल त्यासाठी सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे घेतले होते. त्यातून त्याच्यावर मोठे कर्ज झाले होते. त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याचे मित्रांनी दिलेल्या माहितीतून समोर आले आहे. त्या आर्थिक विवंचनेतूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तपासात पुढे आले आहे.

सुदिप्तो गांगुली याने आपली पत्नी प्रियंका गांगुली आणि मुलगा तनिष्क यांचा खून करुन स्वत: आत्महत्या केल्याचे बुधवारी दुपारी उघडकीस आले. त्यामुळे सर्वच जण चक्रावून गेले होते. 
सुदिप्तो गांगुली याने आत्महत्या केल्याचे वृत्त सर्वत्र तातडीने पसरले. त्यातून सुदिप्तो याच्याबरोबर टीसीएस कंपनीत काम करणारा त्याचा सहकारी मित्र बुधवारी रात्री चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात आला. त्याने गांगुलीच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट केले.

आई-वडिलांना पैसे न देणाऱ्या मुलावर गुन्हा; ज्येष्ठ नागरिक कायद्यानुसार रक्कम देण्याचा निर्णय

कोरोनातील लॉकडाऊननंतर त्याने ऑनलाईन व्यवसाय करण्याचे ठरविले होते. ऑनलाईन भाजी विक्री व्यवसाय करण्याचा त्याचा विचार होता. त्यातूनच त्याने आठ महिन्यांपूर्वी नोकरी सोडली़ आणि पूर्णपणे व्यवसायात स्वत:ला गुंतवून घेतले. ऑनलाईन भाजी विक्रीसाठी त्याने सॉफ्टवेअर डेव्हल करण्याचे काम सुरु केले होते. त्यासाठी त्याने अनेकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे घेतले होते. त्यातून तो आर्थिक अडचणीत सापडला होता. सुदिप्तोने शेवटचा कॉल याच मित्राला केला होता. त्यावेळी त्यांच्याशी त्याचे पैशांबाबत बोलणे झाले होते, असे समोर आले आहे.

Web Title: end of life of husband by killing wife, son in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.