वाळूमाफियांवर अखेर कारवाईचा बडगा, अधिका-यांचे बांधलेले हात सुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 03:06 AM2017-09-13T03:06:39+5:302017-09-13T03:06:39+5:30

अखेर अधिका-यांनी बांधलेले हात सोडले... आणि वाळूमाफियांवर कारवाई सुरू झाली. शिरूर तालुक्यातील वाळूउपसा व वाहतुकीच्या विरोधात महसूल प्रशासनाने धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली.

At the end of the wax, the hands of the officials, and the hands of the officials were released | वाळूमाफियांवर अखेर कारवाईचा बडगा, अधिका-यांचे बांधलेले हात सुटले

वाळूमाफियांवर अखेर कारवाईचा बडगा, अधिका-यांचे बांधलेले हात सुटले

Next

टाकळी हाजी : अखेर अधिका-यांनी बांधलेले हात सोडले... आणि वाळूमाफियांवर कारवाई सुरू झाली. शिरूर तालुक्यातील वाळूउपसा व वाहतुकीच्या विरोधात महसूल प्रशासनाने धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली.
टाकळी हाजी येथे जेसीबी मशीन, ट्रॅक्टरसह सुमारे ६० ब्रासचा अवैध वाळूसाठा जप्त केला आहे. ‘लोकमत’ने या विरोधात आवाज उठवला होता. सातत्याने पाठपुरावा केल्याने प्रशासनाला कारवाई करणे भाग पडले. त्यामुळे वाळूतस्करांना मात्र मोठा धक्का बसला आहे.
वाळूउपशामुळे रस्ते खराब झाले असून अवैध वाळूउपशाचा गोरखधंदा राजरोस सुरू असल्याची तक्रार ग्रामस्थ करीत होते. वाळूमाफियांवर कठोर कारवाई व्हावी व अवैध वाहतुक बंद करावी या बाबत ‘लोकमत’ने आवाज उठविला होता.
त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सौरभ राव, उपविभागिय अधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी दखल घेत कारवाईचे आदेश दिले.
त्यानुसार तहसीलदार रणजित भोसले यांच्यासह पोलीस पथकाने कारवाई करीत कुकडी नदी काठी धडक कारवाई केली.
गेल्या महिनाभरापासून वाळूमाफिया शेतात वाळू काढत होते. तहसीलदार रणजित भोसले यांच्या पथकाने खासगी वाहनामधे येऊन ही कारवाई केली.

नोटिसा काढून दंड आकारणार
तहसीलदार भोसले म्हणाले, की गेल्या चार-पाच महिन्यांत जे वाळूचोरीचे पंचनामे झाले आहेत त्यांना नोटिसा काढून दंड केला जाईल. जे दंड भरणार नाहीत त्यांच्या जमिनीवर बोजा चढविला जाईल.

कवठे येमाईत मोठे अवैध साठे
अद्याप कवठे येमाई परिसरात अनेक ठिकानी वाळूसाठे असून त्यांचे तसेच उत्खनन केलेल्या जमिनीची पाहणी करून पंचनामे करण्यात येतील, असे प्रांत भाऊसाहेब गलांडे यांनी सांगितले.

तहसीलदारांनी दिली वाळूमाफियांना हुलकावणी
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपद्वारे वाळूतस्कर व त्यांचे खबरे एकमेकांना अपडेट करीत असतात. कारवाई होण्याची कुणकुण लागताच ‘व्हॉट्सअ‍ॅप’ वरून अपडेट केले जाते आणि सर्वजण सावध होतात. मात्र या वेळी तहसीलदारांनी त्यांना हुलकावणी देत खासगी वाहनाचा वापर करून ही कारवाई केली त्यामुळे ही कारवाई यशस्वी होऊ शकली.

मुरूममाफियांचा रात्रीस खेळ चाले
चाकण : चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक दोनमध्ये गॅसवाहिनीचे पाइप टाकण्याचे काम सुरू आहे. याकरिता रस्त्याजवळ खोल खोदाई करून पाइप टाकले जात आहेत. यातून निघत असलेला हजारो ब्रास मुरुम परिसरातील कंपन्यांच्या भरावासाठी टाकला जात आहे. महसूल खात्याची फसवणूक करून लाखो रुपयांचा मलिदा संबंधित ठेकेदार खात आहे. रात्रीच्या वेळी मुरुम वाहतूक सुरू आहे. येथील ७५ मीटर रुंदीच्या रस्त्याच्या कडेने गॅसवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम तालुक्यातील एका राजकीय पक्षाचा बडा नेता करीत आहे.
या भागातील गॅसवाहिनी टाकण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले असून किरकोळ काम सुरूअसल्याची स्थिती आहे. परंतु शासकीय काम सुरू आहे, असे भासवून या ठेकेदाराने या
कामात निघालेला हजारो ब्रास
मुरुम परस्पररीत्या परिसरातीलकंपन्या आणि उद्योजकांना विकण्याचा धडाका चालविला आहे. दिवसापेक्षा रात्रीच्या वेळी हा मुरुम चोरून वाहतुकीवर भर दिला जात आहे.

प्रशासन लक्ष देईना, कारवाईदेखील होईना
औद्योगिक भागात अनेक उद्योजकांनी जागा घेतल्या असून त्यांना येथील एका बड्या नेत्याकडून मोठ्या प्रमाणात हा सरकारी जागेतील मुरुम चोरून पुरविला जात आहे. हायवा, मोठे डंपर यांसारखी वाहने त्यासाठी वापरली जात आहेत. प्रमाणापेक्षा जास्त लोड भरून ही वाहतूक केली जात असल्याने नव्याने बनविलेल्या डांबरी रस्त्याचे या वाहतुकीने तीन तेरा वाजले आहेत. महसूल प्रशासन आणि एमआयडीसीचे अधिकारी या गंभीर प्रकाराकडे कानाडोळा करीत आहेत, असा आरोप केला जात आहे.
 

Web Title: At the end of the wax, the hands of the officials, and the hands of the officials were released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे