अभियंत्याला लाकडी दांडक्याने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:11 AM2021-04-08T04:11:02+5:302021-04-08T04:11:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केबल दुरुस्ती करीत असताना रस्त्यावरुन उठले नाही, म्हणून अभियंत्यासह दोघांना एकाने लाकडी दांडक्याने मारहाण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : केबल दुरुस्ती करीत असताना रस्त्यावरुन उठले नाही, म्हणून अभियंत्यासह दोघांना एकाने लाकडी दांडक्याने मारहाण करुन २ वाहनांची तोडफोड केली. ही घटना बालेवाडी येथील सर्व्हिस रोवर सोमवारी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी नेताजी राजेंद्र कागे (वय २४, रा़ वाकड) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. नेताजी हे टेलिकॉम क्षेत्रातील एका नामांकित कंपनीत अभियंता म्हणून काम करतात. सोमवारी रात्री ते सहकाऱ्यासमवेत बालेवाडीत फायबर केबल दुरुस्तीचे काम करत होते. त्यावेळी मोटारीतून आलेल्या एकाने नेताजी यांना रस्त्यावरुन का उठला नाही, असा जाब विचारत दांडक्याने मारहाण केली. नेताजी यांना कारचालक मारहाण करीत असल्याचे पाहून त्यांचा सहकारी ईश्वर सावळे हा मदतीला धावून आला. तेव्हा कारचालकाने त्यालाही मारहाण केली. आरोपीने नेताजी यांचा मोबाईल फोन हिसकावून तेथील दोन कारची तोडफोड केली. चतु:श्रृंगी पोलीस अधिक तपास करीत आहे.