Engineering Admission 2023: अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रिया १२ जूनपासून सुरू

By प्रशांत बिडवे | Published: June 11, 2023 06:19 PM2023-06-11T18:19:26+5:302023-06-11T18:19:49+5:30

दहावीनंतर २ वर्षांचा आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदविकेच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळू शकतो

Engineering degree admission process starts from 12th June | Engineering Admission 2023: अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रिया १२ जूनपासून सुरू

Engineering Admission 2023: अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रिया १२ जूनपासून सुरू

googlenewsNext

पुणे : बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश घेण्यासाठी केंद्रीय प्रवेशप्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरून ऑनलाईन नाेंदणी करीत अर्ज भरावा लागणार आहे. त्यानंतर ११ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली करण्यात येईल आणि त्यानुसार प्रवेश फेऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांचा महाविद्यालयांमधील प्रवेश निश्चित करण्यात येणार आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयाकडून प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना १२ जूनपासून ऑनलाईन नोंदणी करणे तसेच कागदपत्रांची पडताळणीला सुरूवात हाेणार आहे. विद्यार्थ्यांना घरातून संगणक तसेच माेबाईलवरून तसेच सुविधा केंद्रावर जाऊन अर्ज भरणे तसेच कागदपत्रे पडताळणीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना - https://dsd23.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज भरता येणार आहे.

विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या छाननीसाठी दोन पर्याय दिले आहेत. त्यानुसार विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी करून ‘ई-स्क्रूटनी’ पद्धतीचा पर्याय निवडून संगणक/ माेबाईलद्वारे ऑनलाईन अर्ज भरून सबमिट करतील. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करतील. अर्जाच्या पडताळणीसाठी व निश्चितीसाठी कोठेही प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नाही. त्यांचा अर्ज व कागदपत्रे सुविधा केंद्राद्वारे (एफसी द्वारे) पडताळून निश्चित केले जातील. तर दुसऱ्या पर्यायामध्ये मोबाईल / संगणकावरून ऑनलाईन नोंदणी करून ‘प्रत्यक्ष स्क्रूटनी’ पद्धतीचा पर्याय निवडू शकतील. तसेच सुविधा केंद्रावर जाऊन ऑनलाईन नोंदणीसाठी वेळ घेता येईल. विद्यार्थी स्वत: ऑनलाईन अर्ज भरणे, स्कॅन करुन आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे इत्यादी प्रक्रिया करता येईल.

प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता

इयत्ता बारावीमध्ये गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, जीवशास्त्र, इन्फॉर्मेटिक्स प्रॅक्टिसेस, जैवतंत्रज्ञान, कृषी, तंत्र व्यावसायिक विषय, कृषी, अभियांत्रिकी ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज या विषयांतील किमान तीन विषय असलेला विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र आहेत. त्याचप्रमाणे इयत्ता दहावीनंतर दोन वर्षांचा आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदविकेच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळू शकतो.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे 

ऑनलाईन नोंदणी, कागदपत्रे अपलोड करणे : १२ जून ते ३ जुलै
कागदपत्रांची पडताळणी व अर्ज निश्चिती : १२ जून ते ३ जूलै
तात्पुरती गुणवत्ता यादी : ५ जुलै
गुणवत्ता यादीवर हरकती नोंदविणे : ६ ते ९ जुलै
अंतिम गुणवत्ता यादी : ११ जुलै

Web Title: Engineering degree admission process starts from 12th June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.