कल्पनाशक्तीला वाव देऊन अभियंत्यांनी भविष्याचा वेध घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:14 AM2021-09-17T04:14:11+5:302021-09-17T04:14:11+5:30

बेल्हा: अभियंत्यांनी कल्पनाशक्तीला वाव देऊन भविष्याचा वेध घ्यावा, असे प्रतिपादन आयएएस अधिकारी रवींद्र खताळ यांनी केले. येथील समर्थ संकुलात ...

Engineers should look to the future by giving scope to their imagination | कल्पनाशक्तीला वाव देऊन अभियंत्यांनी भविष्याचा वेध घ्यावा

कल्पनाशक्तीला वाव देऊन अभियंत्यांनी भविष्याचा वेध घ्यावा

Next

बेल्हा: अभियंत्यांनी कल्पनाशक्तीला वाव देऊन भविष्याचा वेध घ्यावा, असे प्रतिपादन आयएएस अधिकारी रवींद्र खताळ यांनी केले.

येथील समर्थ संकुलात अभियंता दिनानिमित्त ऑनलाईन वेबिनारचे आयोजन केले होते. समर्थ संकुलात भारतातील प्रख्यात स्थापत्य अभियंता भारतरत्न सर डॉ. विश्वेश्वरय्या मोक्षगुंडम यांचा जन्मदिन ''इंजिनियर्स डे'' म्हणून साजरा करण्यात आला. या वेळी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील, प्राचार्य डॉ. लक्ष्मण घोलप, प्राचार्य राजीव सावंत, प्राचार्य डॉ. संतोष घुले, डॉ.सुभाष कुंभार, पॉलिटेक्निकचे प्राचार्य अनिल कपिले, प्राचार्य पांडुरंग हाडवळे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या वेबिनारसाठी ऑनलाईन सहभागी झाले होते.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना रवींद्र खताळ म्हणाले की, मी स्वतः एक इंजिनिअर आहे. इंजिनिअरच्या कामामध्ये लवचिकता, प्रत्येक गोष्ट जुळवून घेण्याची क्षमता व कला, ऐनवेळचे व्यवस्थापन इ. बाबी अंतर्भूत असतात. या क्षेत्रात प्रत्येक दिवस वेगळा, विषय वेगळा, समस्या वेगळ्या आणि आव्हानात्मक असतो. विद्यार्थीदशेत असताना विशेष करून इंजिनिअरिंग अभ्यासक्रम शिकताना विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्तीने शिक्षण घेतले पाहिजे. सामाजिक भान असले पाहिजे. वेगवेगळे प्रश्न विचारले पाहिजेत. त्यासाठी अभियंत्यांनी कल्पनाशक्तीला वाव देऊन भविष्याचा वेध घ्यावा. ही सर्व खासियत मुळातच इंजिनिअरमध्ये असते, गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची आणि कठोर परिश्रमाची. फावल्या वेळेत आपण काय करतो? यावर भविष्यातील बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात असेही त्यांनी सांगितले..

ऑनलाईन वेबिनारचे नियोजन प्रा. भूषण बोऱ्हाडे यांनी, तर डॉ. अनिल पाटील यांनी आभार मानले. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके,डॉ.महेश भास्कर, प्रा.रुस्तुम दराडे, प्रा.शशिकांत ताजने आदी उपस्थित होते.

१६ बेल्हा

समर्थ शैक्षणिक संकुलात डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पणप्रंसगी उपस्थित असलेले संस्थेचे पदाधिकारी.

160921\img-20210916-wa0134.jpg

बेल्हा(ता.जुन्नर)येथील समर्थ शैक्षणिक संकुलात पुष्पहार अर्पण करताना संस्थेचे पदाधिकारी दिसत आहेत.

Web Title: Engineers should look to the future by giving scope to their imagination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.