तरुण लेखकांमधील सर्जनशीलता हुरुप वाढवणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:11 AM2020-12-31T04:11:14+5:302020-12-31T04:11:14+5:30

दत्तात्रय जगताप : तन्वी निमजे लिखित ‘अ‍ॅस्ट्रो आॅफ अवर्स’ चे प्रकाशन पुणे : ‘शालेय वयातील मुले कादंबरीसारखा साहित्य प्रकार ...

Enhancing creativity among young writers | तरुण लेखकांमधील सर्जनशीलता हुरुप वाढवणारी

तरुण लेखकांमधील सर्जनशीलता हुरुप वाढवणारी

Next

दत्तात्रय जगताप : तन्वी निमजे लिखित ‘अ‍ॅस्ट्रो आॅफ अवर्स’ चे प्रकाशन

पुणे : ‘शालेय वयातील मुले कादंबरीसारखा साहित्य प्रकार लिहित आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. युवा लेखक सर्जनशीलतेचे, प्रगल्भतेचे दर्शन आपल्या लेखनातून घडवतात, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास पाहून हुरूप येतो’ असे प्रतिपादन राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे संचालक दत्तात्रय जगताप यांनी केले.

तन्वी निमजे लिखित अभिषेक टाईपसेटर्स अँड पब्लिशर्स प्रकाशित ‘अ‍ॅस्ट्रो ऑफ अवर्स’ पुस्तकाच्या प्रकाशनावेळी जगताप बोलत होते. पत्रकार भवनात झालेल्या कार्यक्रमाला इंडियन बँकेचे विभागीय व्यवस्थापक मनीष कुमार, उपविभागीय व्यवस्थापक राजीव रंजन, सह-महाव्यवस्थापक रणजित सिंग, वरिष्ठ व्यवस्थापक वजाहत अली व तन्वीचे वडील सह-महाव्यवस्थापक प्रकाश निमजे, आई ज्योती निमजे, प्रकाशक मंगेश वाडेकर आदी उपस्थित होते. मंगेश वाडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. सतीश गेजगे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Enhancing creativity among young writers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.