व्यसनांना तिलांजली देऊन सुंदर जीवन जगा
By admin | Published: November 14, 2014 11:42 PM2014-11-14T23:42:39+5:302014-11-14T23:42:39+5:30
व्यसनांना तिलांजली देऊन सुंदर जीवन जगण्याचा प्रयत्न करा, असा मूलमंत्र 108 मुनीश्री प्रतीकसागर महाराज यांनी सर्वधर्मीय सत्संग सोहळ्यात भाविकांना दिला.
Next
दौंड : व्यसन हे मनुष्य आणि समाजाच्या दृष्टीने घातक आहे. तेव्हा व्यसनांना तिलांजली देऊन सुंदर जीवन जगण्याचा प्रयत्न करा, असा मूलमंत्र 108 मुनीश्री प्रतीकसागर महाराज यांनी सर्वधर्मीय सत्संग सोहळ्यात भाविकांना दिला.
व्यसनामुळे मानवाची, कुटुंबाची आणि समाजाची हानी होत असते. तेव्हा व्यसनेही काही माणसं स्वत:हून लावून घेतात. तर काही मित्रंच्या सहवासात राहून व्यसनी होतात. त्यानुसार जीवनात सर्वात मोठे विष म्हणजे विविध प्रकारची व्यसने होय. तेव्हा माणसांनी व्यसने सोडून धार्मिक आणि सामाजिक सत्संग सोहळ्य़ात हजेरी लावून तेथील चांगले गुण अंगीकारले पाहिजे, की जेणोकरुन जीवन स्वर्ग बनेल. वाईट गोष्टी समाजातून नष्ट झाल्या पाहिजे. त्यासाठी वाईट लोकांवर सामाजिक बहिष्कार घातला, तर ख:या अर्थाने एक आदर्श समाज प्रणाली निर्माण होणार आहे. तेव्हा मानवाने व्यसने करु नयेत, असे प्रतीक सागरजी महाराज म्हणाले. सुशील शहा यांनी प्रास्ताविक, तर तुषार दोशी यांनी सूत्रसंचालन केले. शंकुतला गोलांडे यांनी मनोगत व्यक्त केले. दिवाकर लुंड, प्रताप लुंड, वैभव टाटिया, अरविंद गोलांडे, मनिष कांबळे यांनी दीपप्रज्वलन केले, तर महाराजांना वसंत सैजवाल यांनी शास्त्रभेट दिली. सायंकाळच्या दुस:या सत्रत मार्गदर्शन करताना प्रतीकसागरजी महाराज म्हणाले, की वाईट कामांचा सामना करा, पाप केले असेल, तर त्याचे प्रायचित्त करा. कारण त्यातूनच चांगला मार्ग मिळणार आहे. स्त्री ही स्त्रीची वैरी असते. ब:याचदा मुलगी होणार म्हणून गर्भपात केले जातात. याच्याशिवाय जगात दुसरे कुठलेही पाप नाही. तेव्हा स्त्रीभ्रूणहत्या करण्याचे पाप करु नका, असे प्रतीकसागर महाराज म्हणाले. शेवटी एक हजार आठ दीपोत्सवाने महाराजांची महाआरती करण्यात आली. दरम्यान शनिवार (दि.15) रोजी सर्वधर्मीय सत्संग महोत्सवाची सांगता होत आहे. (वार्ताहर)
हीच खरी गुरुदक्षिणा
4भाविकांना मार्गदर्शन करताना प्रतीकसागरजी महाराज म्हणाले, की गुरूला प्रत्येक शिष्याने गुरुदक्षिणा देणो बंधनकारक आहे. त्यानुसार मलाही गुरुदक्षिणा मिळाली पाहिजे. ती म्हणजे सर्वानी निव्र्यसनी झाले पाहिजे. सभामंडपातून बाहेर जाताना व्यसने सोडून जा, हीच माझी मोठी गुरुदक्षिणा आहे, असे सांगून त्यांनी उपस्थित पुरुषांना व्यसन न करण्याची शपथ दिली.