पावसाचा आनंद घ्या बिनधास्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:10 AM2021-07-27T04:10:14+5:302021-07-27T04:10:14+5:30

पावसात फिरताेय त्यामुळे शूजमध्ये पाणी जाणारच. त्याशिवाय मजाही नाही, परंतु आपण कामाला लागल्यावर हे शूज लवकर सुकले पाहिजेत, अन्यथा ...

Enjoy the rain without hesitation! | पावसाचा आनंद घ्या बिनधास्त!

पावसाचा आनंद घ्या बिनधास्त!

Next

पावसात फिरताेय त्यामुळे शूजमध्ये पाणी जाणारच. त्याशिवाय मजाही नाही, परंतु आपण कामाला लागल्यावर हे शूज लवकर सुकले पाहिजेत, अन्यथा दिवसभर ओले शूज घालून इरिटेट व्हावे लागते.

पावसाळ्यात कोणते शूज घालायचे हे फार महत्त्वाचे आहे. ओलावा दूर ठेवण्यासाठी आणि आपले पाय कोरडे ठेवण्यासाठी चांगले सॉक्स असणे आवश्यक आहे. सर्वात चांगले म्हणजे रबरी शूज. रबरी शूजमध्ये पाणी शिरत नाही. अगदी खड्यातूनही चालले तरी फार त्रास होत नाही. शूजबरोबरच सँडल्सही चांगला पर्याय आहे. सँडल्समुळे पाय मोकळे राहतातच, पण पाणी लगेच सुकून जाते.

तुम्हाला खूप चालायची सवय असेल तर पावसामुळे थांबू नका. स्टायलिश आणि वॉटरप्रूफ स्नीकर्स वापरा. त्यामुळे पावसातही चालण्याचा आनंद मिळेल. सध्याचा नवी ट्रेंड स्लाईडरचा आहे. पावसाळी वातावरणात हे स्लाईडर आरामदायी असतात. फुटबेड प्रशस्त असल्याने चालण्याचा आनंद मिळतो.

पावसाळा आहे म्हणून फॅशनशी तडजोड करण्याची गरज नाही. तुमचे बूट, सँडल, चप्पल घेताना फक्त वॉटरप्रूफ आहेत का हेच पाहा. महत्त्वाचे म्हणजे त्यांचे सोल (तळवे) कसे आहेत हे तपासून घ्या. चांगले सोल नसतील तर पावसात घसरू शकतात.

- निधी भंडारी-धरमा

Web Title: Enjoy the rain without hesitation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.