‘स्वाइन फ्लू’विषयी वेल्ह्यात प्रबोधन
By Admin | Published: December 1, 2014 03:46 AM2014-12-01T03:46:40+5:302014-12-01T03:46:40+5:30
स्वाइन फ्लू टाळण्यासाठी आपल्या आजूबाजूचा परिसर व वातावरण नेहमी स्वच्छ ठेवा,
मार्गासनी : स्वाइन फ्लू टाळण्यासाठी आपल्या आजूबाजूचा परिसर व वातावरण नेहमी स्वच्छ
ठेवा, असे आवाहन स्विस ट्रॉपिकल अॅन्ड पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूट स्वित्झर्लंडचे प्राध्यापक डॉ. मिचेल वीस यांनी वेल्हे येथील
स्वाइन फ्लूविषयी एकदिवसीय कार्यशाळेत केले.
स्विस ट्रॉपिकल अॅन्ड
पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूट स्वित्झर्लंड व महाराष्ट्र मानव विज्ञान परिषद आणि पंचायत समिती वेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सभागृहात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. वीस
बोलत होते.
ते पुढे म्हणाले, की ग्रामीण भागात स्वाईन फ्लूविषयी अज्ञान आहे. साधा ताप आला, तरी त्याचा वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपणास स्वाईन फ्लू होऊ नये म्हणून आपल्या आजूबाजूला असलेला परिसर व वातावरण नेहमी स्वच्छ ठेवा, असे आवाहन केले आहे.
महाराष्ट्र मानव विज्ञान परिषदेच्या संचालिका विदुला पुरोहित यांनी स्वाईन फ्लूबद्दलची लक्षणे, प्रतिबंधक उपाय सविस्तरपणे मांडले. पुणे जिल्ह्यातील मावळ व वेल्हा तालुक्यात स्वाईन फ्लूविषयी संशोधन करण्यात आले. वेल्ह्यातील वांगणीवाडी, सोंडे कार्ला, गुंजावणे, मेटपिलावरे, खोपडेवाडी, माझगाव, आंबेड, कोंडगाव, घिसर, कानंद, कोदापूर या गावात स्वाईन फ्लूविषयी लोकामध्ये गटचर्चा करून, तर काही लोकांच्या मुलाखती घेऊन संशोधन करण्यात आले, अशी माहिती पंचायत समितीचे माजी सभापती गणपत पंडित यांनी दिली.
या वेळी जिल्हा परिषदेचे
माजी सदस्य आनंद देशमाने, माजी सभापती निर्मला जागडे, उपसभापती चंद्रकांत शेंडकर, गटविकास अधिकारी गोकुळदास बैरागी, डॉ. ख्रिश्चन स्वॅट्टी, निशा सुंदरम, महाराष्ट्र विज्ञान परिषदचे सचिव गणपत पंडित, मुख्य संशोधक डॉ. अभय कुदळे, संशोधक विदुला पुरोहित, बालविकास प्रकल्प अधिकारी संगीता जाधवर, पर्यवेक्षिका मीना वायाळ, प्रतिभा बरबरे, वेल्ह्याचे सरपंच संतोष मोरे, माजी उपसरपंच सुनील भुरुक आदींसह अंगणवाडीताई, ग्रामसेवक, सरपंच, ी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सभापती गणपत पंडित यांनी केले. निर्मला जागडे यांनी आभार मानले. (वार्ताहर)