डोंगरची काळी मैना पूर्व हवेलीत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:09 AM2021-06-20T04:09:07+5:302021-06-20T04:09:07+5:30
असलेली करवंदे व जांभूळ हा रानमेवा पूर्व हवेलीत दाखल झाला आहे. सध्या शहरात तुरळक प्रमाणात करवंदांची विक्री होत आहे. ...
असलेली करवंदे व जांभूळ हा रानमेवा पूर्व हवेलीत दाखल झाला आहे. सध्या शहरात तुरळक प्रमाणात करवंदांची विक्री होत आहे. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा करवंदांची तुरट-गोड चव काहीशी महागली आहे. कोकणासह विविध भागांत डोंगरकडे, जंगलामध्ये आढळणारी करवंदे हा रानमेवा लहानग्यांपासून सर्वांनाच भुरळ पाडतो. आकाराने लहान आणि चवीला तुरट- गोड असलेली डोंगरची काळी मैना आता कदमवाकवस्तीमध्ये दाखल झाली आहे. शाळा बंद असल्याने दिवसभर घरात असणाऱ्या बालचमूंना जांभूळ विक्री करणारे राजेंद्र रेखले यांच्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने आकर्षित करीत आहेत.
"मैना माझी लय गोड..'काळी मैना लय गोड, मैना माझी गोड... डोंगरची मैना अन् मैनाबाई
नांदायला जाईना...' असा सूर लक्ष वेधून घेत आहेत.
गाणं म्हणत असतानाच व्हिडीओ काढण्यासाठी लहान मुलांची गर्दी होत आहे.सोशल मीडियावर त्यांचे व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत.