जाधव महाविद्यालयात रोगप्रतिकारकशक्ती कार्यशाळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:10 AM2021-07-11T04:10:18+5:302021-07-11T04:10:18+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ऑनलाईन पध्दतीने ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
ऑनलाईन पध्दतीने आळे महाविद्यालयात घेतलेल्या या कार्यशाळेत दहा व्हाॅट्सॲप ग्रुप तयार करण्यात आले होते.
सध्याच्या कोरोना काळात रोग प्रतिकारकशक्ती वाढवणे गरजेचे असून याकरिता नियमितपणे योग व प्राणायाम यांची विविध आसने करणे गरजेचे असल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष भाऊशेठ कुऱ्हाडे यांनी व्यक्त केले.
प्राचार्य सुभाष वाडेकर यांचे मार्गदर्शनाखाली डाॅ. अरूण गुळवे यांनी शिबिराचे संयोजन केले. जवळपास आठशेच्यावर विद्यार्थी व शिक्षकवृंद या ऑनलाईन कार्यशाळेत सहभागी झाले होते. आर्ट ऑफ लिव्हिंगचे दत्ता आळेकर, अविनाश वर्मा, हर्षीत चौधरी, आतार सिंग, पूनम जैस्वाल, प्रिया गुप्ता व रिंम्पी बजर यांनी मार्गदर्शन केले.