शेलपिंपळगाव येथे पोषण जनजागृती अभियान उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:16 AM2021-09-10T04:16:21+5:302021-09-10T04:16:21+5:30

एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत गावातील अंगणवाडी केंद्रांमध्ये जागतिक पोषण कार्यक्रमात पथनाट्य, पोषणाबद्दल प्रश्नोत्तरे स्पर्धा, किशोरवयीन मुली, गरोदर ...

Enthusiasm for nutrition awareness campaign at Shelpimpalgaon | शेलपिंपळगाव येथे पोषण जनजागृती अभियान उत्साहात

शेलपिंपळगाव येथे पोषण जनजागृती अभियान उत्साहात

Next

एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत गावातील अंगणवाडी केंद्रांमध्ये जागतिक पोषण कार्यक्रमात पथनाट्य, पोषणाबद्दल प्रश्नोत्तरे स्पर्धा, किशोरवयीन मुली, गरोदर माता, स्तनदा माता यांच्यात पोषण आहार विषयी जनजागृती करण्यात आली. सुमारे पन्नासहून अधिक महिलांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. महिलांनी पोषणयुक्त आहार बनवून त्यांच्यात स्पर्धा घेऊन बक्षीस वितरण केले. तसेच गरोदर मातांचे ओटीभरण करून त्यांना आहारात समाविष्ट करावयच्या पोषणाबद्दलची माहिती दिली. तर ''बेटी बचाओ, बेटी पढाओ'', '' झाडे लावा, झाडे वाचवा'' असे संदेश देण्यात आले.

आहार स्पर्धेत जयश्री पंडित कराळे, संगीता गायकवाड, नंदा पोतले, सुरेखा दौंडकर, सुनीता कदम, वैशाली मोहिते, सुनीता कराळे, दुर्गा दौंडकर, उषा कराळे, शुभांगी इंगळे आदींनी यश संपादन केले. आहार स्पर्धेचे परीक्षण आरती गोतमारे यांनी केले. उपक्रमाचे सरपंच विद्या मोहिते यांनी पाहणी करून विशेष कौतुक केले.

०९ शेलपिंपळगाव अभियान

शेलपिंपळगाव येथे पोषण आहार विषयी जनजागृती करताना उपक्रमार्थी महिला.

Web Title: Enthusiasm for nutrition awareness campaign at Shelpimpalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.