संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत वारक-यांचा उत्साह शिगेला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2018 05:07 PM2018-07-07T17:07:51+5:302018-07-07T17:08:24+5:30
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सकाळी आळंदीतून प्रस्थान झाले असून सध्या पालखी विसाव्यासाठी पुण्यातील फुलेनगर भागात थांबली आहेत.
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सकाळी आळंदीतून प्रस्थान झाले असून सध्या पालखी विसाव्यासाठी पुण्यातील फुलेनगर भागात थांबली आहेत. पुढच्या काही तासात पालखी पुणे शहरात दाखल होईल. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सकाळी आळंदीतून प्रस्थान झाले. लाखो वारकरी हरिनामाचा गजर करत पुणे शहराकडे चालू लागले.
पुणे शहरातील विश्रांतवाडी भागात पालखी 2.30 वाजता दाखल झाली. पालखी विश्रांतवाडीत दाखल झाल्यानंतर पावसाने सुद्धा पालखीचे स्वागत केले. यावेळी हजारो नागरिक पालखीचे दर्शन घेण्यासाठी विश्रांतवाडी चौकात आले होते. पुढे पालखी फुलेनगरकडे मार्गस्थ झाली.
दरम्यान ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी चहा, बिस्कीट, गुडदाणीचे वाटप करण्यात आले. काही ठिकाणी जेवणाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती. विविध संस्थांतर्फे वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यात आली. संध्याकाळी 6 च्या सुमारास ज्ञानेश्वरांची पालखी शिवाजीनगर भागात दाखल होईल. शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे शिवाजीनगर येथे आपल्या धारकाऱ्यांसह पालखीत दाखल होणार असल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.