चतुर्थी निमित्त आठ महिन्यानंतर थेऊर मध्ये उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:31 AM2020-12-04T04:31:38+5:302020-12-04T04:31:38+5:30

कोरोनाच्या धास्तीने भाविकांची संख्या सकाळी कमी होती दुपारनंतर गर्दी काही प्रमाणात वाढल्याचे चित्र दिसत होते. आज पहाटे सतिश आगलावे ...

Enthusiasm in Theur after eight months on the occasion of Chaturthi | चतुर्थी निमित्त आठ महिन्यानंतर थेऊर मध्ये उत्साह

चतुर्थी निमित्त आठ महिन्यानंतर थेऊर मध्ये उत्साह

Next

कोरोनाच्या धास्तीने भाविकांची संख्या सकाळी कमी होती दुपारनंतर गर्दी काही प्रमाणात वाढल्याचे चित्र दिसत होते. आज पहाटे सतिश आगलावे यांनी श्रींची पूजा केली. तसेच चिंचवड देवस्थानच्या वतीने महापूजा करण्यात आली. मंदिर प्रशासनाच्या वतीने सोशल डिस्टनसिंग पाळले जावे यासाठी निश्चित अंतरावर चॉकोन आखण्यात आले होते. जागोजागी सॅनिटायझर स्टँड लावण्यात आलेले असून योग्य त्या सूचना दिल्या जात आहेत. भाविकांचे तापमान तपासून त्यांना आत सोडले जात होते.थर्मल स्कॅनिंग केले जात होते.सर्व व्यवस्थेवर विश्वस्थ आनंद महाराज तांबे व डॉ पोफळे लक्ष ठेवून होते.नेहमीप्रमाणे असणाऱ्या प्रसादाचे नियोजन कोरोनाच्या धर्तीवर बंद करण्यात आले आहे.चंद्रोदयानंतर श्रींच्या छबिण्याचा कार्यक्रम पार पडला.

--

व्यवसायिकांना मिळाली चालना

चौकट

-- स्थानिक व्यवसायिकांमध्ये उत्साह

मागील आठ महिन्यांपासून मंदिर बंद असल्याने स्थानिक व्यवसायांचे हाल झाले होते.राज्य शासनाने मंदिरे उघडण्यास परवानगी दिल्याने पुन्हा एकदा पर्यटक,भाविक थेऊर मध्ये येऊ लागल्याने स्थानिक व्यवसायिकांमध्ये उत्साह पहावयास मिळाला.स्थानिक व्यावसायिक देखील सोशल डिस्टनसिंग ठेऊन व्यवसाय करत असल्याचे चित्र दिसले.

Web Title: Enthusiasm in Theur after eight months on the occasion of Chaturthi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.