ग्रामपंचायत निवडणुकीच्या चिन्हांत संपूर्ण भाजी मंडई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:09 AM2021-01-02T04:09:57+5:302021-01-02T04:09:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीच्या चिन्ह वाटपात संपूर्ण भाजी मंडईच भरली आहे. भेंडी, फ्लॉवर, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीच्या चिन्ह वाटपात संपूर्ण भाजी मंडईच भरली आहे. भेंडी, फ्लॉवर, ढोबळी मिरची, मका, वाटाणेसह १० फळभाज्या, ९ विविध प्रकारची फळे, ब्रेकफास्टचे बिस्किट, पाव, केक आणि व्हेजथाळीचा समावेश केला आहे. ऐवढेच नाही तर जेवणानंतर आईस्क्रीम देखील निवडणूक चिन्ह म्हणून उमेदवार घेऊ शकतो. याचबरोबर पेन ड्राईव्ह, टीव्ही रिमोट, आधुनिक क्रेनसह तब्बल १९० अशी चिन्हांची भलीमोठी यादीच दिली आहे.
जिल्ह्यातील ७४६३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. ४ जानेवारी रोजी उमेदवारी माघारी नंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वापट करणार आहे. यात उमेदवारांची संख्या लक्षात घेऊन निवडणूक चिन्हांत ४० ने वाढ करत तब्बल १९० चिन्हांचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांना अपले निवडणूक चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवणे सहज शक्य होणार आहे.
--
ही आहेत नवीन निवडणूक चिन्हे
ग्रामपंचायत निवडणुकीत बहुतेक सर्व फळे व भाज्या, व्हेज थाळी, पाव, केकसह आधुनिक क्रेन, पेन ड्राईव्ह, माऊस या काही चिन्हांचा नव्याने समावेश केला आहे.
--
ही फळे आहेत निवडणूक चिन्ह : सफरचंद, नारळ, द्राक्षे फणस, पेरू, अननस कलिंगड, अक्रोड
----‐-
या फळभाज्यांचा समावेश : ढोबळी मिरची, प्लॉवर, आले, हिरवी मिरची, भेंडी, मका, भुईमुग, वाटाणे
--------
पॅनल केले तरी वेगवेगळे चिन्हांवरच लढावे लागणार
ग्रामपंचायत निवडणुकीत बहुतेक ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी अनेक वाॅर्डातील उमेदवार एकत्र येऊन पॅनल करतात. ग्रामपंचायतींसाठी पॅनल केले तरी पॅनेलमधील सर्व उमेदवारांना वेगवेगळे निवडणूक चिन्हांवर निवडणूक लढवावी लागणार आहे.