राज्य स्तरीय एकांकिका स्पर्धेत ‘एंट्री एक्झिट’ प्रथम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 07:44 PM2018-04-18T19:44:57+5:302018-04-18T19:44:57+5:30

पिंपरी चिंचवड अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कोहिनूर ग्रुप आणि श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने १९ वी राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा नुकतीच आयोजित करण्यात आली होती.

'Entry Exit' First in State Level ekankika Competition | राज्य स्तरीय एकांकिका स्पर्धेत ‘एंट्री एक्झिट’ प्रथम 

राज्य स्तरीय एकांकिका स्पर्धेत ‘एंट्री एक्झिट’ प्रथम 

googlenewsNext
ठळक मुद्देकलाकार म्हणून स्वत:ला घडविताना सातत्याने नाटक बघणे महत्वाचेचित्रपटात असलो तरी नाटकाचे वेड कमी होत नाही. 

पिंपरी : पिंपरी चिंचवड अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कोहिनूर ग्रुप आणि श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने १९ वी राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत चोवीस एकांकिका सादर झाल्या. पिंपरी-चिंचवड महाविद्यालयाची एंट्री एक्झिट ने प्रथम क्रमांक पटकाविला.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पारितोषिक वितरण समारंभ प्रसिद्ध दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी आणि सूत्रसंचालक-निवेदक नाना शिवले यांच्या हस्ते पार पडला. पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाची एंट्री एक्झिट ही एकांकिका प्रथम, भरतनाट्य संशोधन मंदिराची यज्ञाहुती व्दितीय क्रमांक, नवोदिता चंद्रपूर या संस्थेची नथिंग टू से  या एकांकिकेने तिसरा क्रमांक पटकाविला. तर रसिक हो कल्याण यांची एका रुढीत रुतलेलं स्वप्न ही उत्तेजनार्थ आली. प्रथम आलेल्या पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाला दिग्दर्शन व अभिनय पुरुष प्रथम अथर्व ठाकरे,भूमिका सखा), नेपथ्य व्दितीय(सुयश साळवेकर व अभिषेक बिल्दीकर ), पार्श्वसंगीत  (वेदांत सेलोकर आणि श्रद्धा टिल्लू) अशीही इतर पारितोषिके मिळाली. भरत नाट्य संशोधन मंदिराचे आशुतोष नेर्लेकर यांना दिग्दर्शनाचे दुसरे व अभिनयाचे उत्तेजनार्थ ही पारितोषिके मिळाली. याच संस्थेस स्त्री अभिनय (उमा जोशी,भूमिका- शिखंडी),नेपथ्य प्रथम क्रमांक (विठ्ठल जितेंद्र )आणि प्रकाश योजना प्रथम क्रमांक (सुधीर फडतरे) ही पारितोषिके मिळाली.  नाट्य रसिक हो , कल्याण यांच्या पूनम कुलकर्णी (भूमिका- माणसा )हिला रुढीत रुतलेलं स्वत्व या एकांकिकेसाठी अभिनय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले .स्त्री अभिनयाची उत्तेजनार्थ पारितोषिके बकुळ धवने (भूमिका- मालविका, संस्था- नवोदिता चंद्रपूर, एकांकिका नथिंग टू से व दर्पण संस्था, सातारा यांच्या 'समर्पण’ एकांकिकेत दीपेंती चिकणे (भूमिका- वहिनीसाहेब) यांनाही मिळाली. प्रकाश योजना प्रथम पारितोषिक भरत नाट्य संशोधन मंदिर यज्ञाहुतीसाठी सुधीर फडतरे आणि द्वितीय पारितोषिक नवोदिता, चंद्रपूर नथिंग टू से साठी हेमंत गुहे यांना मिळाले. स्पर्धेचे परीक्षण नाटय क्षेत्रातील दिग्गज प्रदीप तपस्वी, अशोक अडावदकर, अरुंधती कामत यांनी केले. 
निपुण धर्माधिकारी यांनी सहभागींना मार्गदर्शन करताना सांगितले, एकांकिका किंवा स्पर्धेसाठी मुळीच नाटक करू नका. आवडेल ते मनापासून करा. तसेच कलाकार म्हणून स्वत:ला घडविताना सातत्याने नाटक बघणे महत्वाचे आहे.तर नाटक ही एकच कला अशी आहे की ज्यामध्ये आपणास हवे त्या पद्धतीने सुधारणा करण्याचा मार्ग खुला असतो. त्यामुळे चित्रपटात असलो तरी नाटकाचे वेड कमी होत नाही. 
यावेळी परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सुहास जोशी, सूत्रसंचालन नरेंद्र आमले व आभार प्रदर्शन किरण येवलेकर यांनी केले. 

Web Title: 'Entry Exit' First in State Level ekankika Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.