पर्यावरण, आरोग्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:09 AM2021-09-13T04:09:24+5:302021-09-13T04:09:24+5:30

इंदापूर महाविद्यालयात सायकल क्लबचे उद्घाटन बारामती: पर्यावरण दृष्टिकोनातून सायकल चालवणे महत्त्वाचे आहे. यामुळे आपले आरोग्य देखील जपले जाईल. ...

Environment, for health | पर्यावरण, आरोग्यासाठी

पर्यावरण, आरोग्यासाठी

Next

इंदापूर महाविद्यालयात सायकल क्लबचे उद्घाटन

बारामती: पर्यावरण दृष्टिकोनातून सायकल चालवणे महत्त्वाचे आहे. यामुळे आपले आरोग्य देखील जपले जाईल. ज्या वेळेस महाविद्यालय सुरू होईल त्या वेळी ये-जा करताना सायकलचा वापर करावा, असा सल्ला माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना दिला.

इंदापूर येथे रविवारी (दि. १२) इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये आय कॉलेज सायकल क्लबचे उद्घाटन माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी संस्थेचे खजिनदार ॲड.मनोहर चौधरी, सचिव प्रा. बाळासाहेब खटके, संचालक तुकाराम जाधव,पराग जाधव उपस्थित होते.

पाटील पुढे म्हणाले की, नव्या पिढीला व्यायाम व सायकल चालवण्याचे महत्त्व पटवून द्यावे. इंदापूर,बावडा भिगवण येथे मोठे सायकल क्लब झालेले आहेत.त्याच्या माध्यमातून तयार झालेले सुमारे चारशे ते पाचशे सायकलस्वार नियमित सायकल रॅली मध्ये सहभाग होत आहेत. इंदापूर महाविद्यालयाचे दोन विद्यार्थी सायकलवरून रामेश्वरमला गेले आहेत. २ हजार ३०० किलोमीटरचा हा सायकलप्रवास करण्याचे धाडस त्यांनी दाखवले आहे. भिगवण व राजेगावचे तरुण २ हजार ६०० किलोमीटर सायकल प्रवास करुन आलेले आहेत. त्यामुळे भविष्यात आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी सायकलचे महत्त्व वाढणार आहे, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी केले. या वेळी ४० प्राध्यापकांनी दररोज सायकलींचा वापर करण्याचा मनोदय व्यक्त केला असल्याचे त्यांनी सांगितले.

इंदापूर येथे आय कॉलेज सायकल क्लबचे उद्घाटन माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सायकल चालवून केले.

१२०९२०२१-बारामती-०९

Web Title: Environment, for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.