पर्यावरण, आरोग्याचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:13 AM2021-09-08T04:13:40+5:302021-09-08T04:13:40+5:30

बारामती : पर्यावरण आणि आरोग्याचा महत्वपूर्ण संदेश देत बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शिक्षकदिनाचे ...

Environment, health message | पर्यावरण, आरोग्याचा संदेश

पर्यावरण, आरोग्याचा संदेश

Next

बारामती : पर्यावरण आणि आरोग्याचा महत्वपूर्ण संदेश देत बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शिक्षकदिनाचे औचित्य साधून फाउंडेशनच्या सदस्यांनी बारामती-जेजुरीगड-बारामती हे १०० किमी अंतर आणि जेजुरीगड-कडेपठार हा १४ किमीचा ट्रेक यशस्वी केला.

वय वर्षे ८ ते ६५ वयाच्या फाउंडेशनच्या ६० पेक्षा जास्त सदस्यांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला. जयाद्री डोंगररांगा, नुकताच पावसाळी वातावरणामुळे तयार झालेली मनोहारी हिरवळ, घाटमाथा, पेशवेकालीन तलाव, अहिल्याबाई होळकर यांनी वसवलेली चिंचेची बाग आदी बाबींची माहिती घेत सदस्यांनी जेजुरीगड आणि परिसरात भ्रमंती केली. सांस्कृतिक भवन, जेजुरी येथे नुकतेच चौथ्या वेळेस आयर्नमॅन झालेले दशरथ जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

निसर्गाच्या सान्निध्यात, मार्तंड भैरवाच्या आशीर्वादात आणि आयर्नमॅन दशरथ जाधव यांच्या स्फूर्तिदायी अनुभव कथनातून शिक्षक दिन खऱ्या अर्थाने सार्थकी लागला असे मत आयर्नमॅन बारामती स्पोर्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश ननवरे यांनी व्यक्त केले.

—————————————————

फोटोओळी—शिक्षक दिनाचे औचित्य साधून फाउंडेशनच्या सदस्यांनी बारामती-जेजुरीगड-बारामती प्रवासासह जेजुरीगड-कडेपठारचा ट्रेक यशस्वी केला .

०८०९२०२१ बारामती—०३

——————————————

Web Title: Environment, health message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.