रक्षाबंधनातून केली पर्यावरणात्मक जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 01:26 AM2018-08-28T01:26:42+5:302018-08-28T01:27:11+5:30

जिल्ह्यात विविध शाळा, संस्थांनी सामाजिक संदेश देत सण साजरा : वंचित घटकांनाही आनंद देऊन दाखविले माणुसकीचे दर्शन

Environmental awareness done by Rakshabandhan | रक्षाबंधनातून केली पर्यावरणात्मक जागृती

रक्षाबंधनातून केली पर्यावरणात्मक जागृती

Next

बहीण-भावाच्या अतूट प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन हा सण जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला; मात्र यंदाच्या सणाचे वेगळेपण म्हणजे, केवळ स्वत:पुरताच आनंद साजरा न करता समाजातील वंचित घटक; तसेच समाजाच्या रक्षणासाठी दिवसरात्र डोळ्यांत तेल घालून जागता पहारा देणाऱ्या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. अनाथ मुले, वाहतूक पोलीस यांच्याबरोबरच पर्यावरणाचे रक्षण करणाºया वृक्षांनाही राख्या बांधून महिलांनीच नव्हे, तर युवकांनीही पर्यावरण रक्षणाचा, माणुसकीचा संदेश दिला. पोलिसांनीही संरक्षणाची हमी दिली.

कडूसला राखी बनविण्याची कार्यशाळा
चासकमान : कडूस येथील डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांबरोबरच शाळेच्या परिसरातील झाडांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. वृक्षांविषयी कृतज्ञता व्यक्त करून पर्यावरण संरक्षणाचा संदेशही दिला. डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर राखी बनविण्याची नावीन्यपूर्ण कार्यशाळा आयोजित केली होती. कार्यशाळेत विद्यार्थ्यांच्या कल्पकता, नवनिर्मिती व सृजनशीलतेला चालना देण्यासाठी विविध नमुन्याच्या राख्याची निर्मिती करण्यात आली. वृक्षांना राख्या बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश देत ‘बेटी बचाव-बेटी पढाव’ असा निर्धार करण्यात आला.

ज्ञानमंदिरातील, शाळेतील बहिणींनी सर्व चिमुकल्या भावंडांना औक्षण करून राख्या बांधल्या. भावंडांनीही बहिणींचे आशीर्वाद घेतले. चिमुकल्या भावांनी बहिणींना पेन, पेन्सिल, कंपासपेटी असे शालोपयोगी साहित्य भेट दिले. या वेळी अध्यक्ष प्रतापराव गारगोटे, मुख्याध्यापक शिवाजी गुंजाळ, व्यवस्थापिका जयश्री गारगोटे आदींसह विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
वाफगावात वृक्ष रक्षाबंधन उपक्रम

वाफगाव : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाडकवाडी (ता. खेड) येथे ‘दप्तराविना शाळा’ हा उपक्रम साजरा झाला. तसेच, विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनासाठी गोडी लागावी म्हणून वृक्ष रक्षाबंधन उपक्रम साजरा करण्यात आला. संत तुकाराममहाराजांनी वृक्षांना सगेसोयरे मानले; तसेच नागरिकांनी व विद्यार्थ्यांनीदेखील वृक्षसंवर्धनाची जबाबदारी घ्यावी. सध्या सुरू असलेला पर्यावरणाचा ºहास थांबविण्यासाठी म्हणून या शाळेतील विद्यार्थ्यांनी झाडांना राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. तसेच, वृक्षांचे औषधी गुणधर्म समजावून दिले. त्यातील काही वृक्ष विद्यार्थ्यांना दत्तक देण्यात आले. शाळेतील विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या. यावेळी मेहंदी स्पर्धेचे आयोजन केले होते. याप्रसंगी मुख्याध्यापक पौर्णिमा लोखंडे, विश्वनाथ कांबळे, सुभाष राधवन, शैला रणपिसे, मीनाक्षी गावडे, रूपाली खंडागळे व मोठया संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

वृक्षांना राख्या बांधून राखीपौर्णिमा
वेल्हे : आज राखीपौर्णिमा सण वेल्हे तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवपाल येथे अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. निसर्गप्रेम व पर्यावरणवादी दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी विद्यार्थिनींनी शाळेच्या परिसरातील वृक्षांना भाऊ मानत राख्या बांधल्या. झाडांना राख्या बांधून निसर्गाचे रक्षण करण्याचा व पर्यावरणाविषयी आपुलकीचा संदेश यामधून दिला. या वेळी गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.

शाळेत रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या तसेच रक्षाबंधनाच्या या शुभ दिवसी विद्यार्थ्यांनी परिसरामध्ये विविध प्रकारची प्रत्येक विद्याथ्यार्ने ३ झाडे लावली. झाडानां कु. सुरेखा खुटेकर, कु. सानिका शिंदे, कु. आरती शिळीमकर, कु. प्रणाली शिळीमकर, कु. काजल पिलावरे या विद्यार्थिनींने राख्या बांधून रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमाच्या वेळी गावचे सरपंच राजू ढेबे, माजी सरपंच भगवान शिंदे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजू खुळे, वाजेघर केंद्राचे केंद्रप्रमुख दीपकराव नलावडे, गावातील दीपक शिळीमकर, तानाजी शिळीमकर, पोपट शिळीमकर, मुख्याध्यापक रत्नप्रदीप मुधळे सर हे उपस्थित होते. शाळेतील या नवउपक्रमाबद्दल गावकºयांनी, पदाधिकाºयांनी व केंद्रप्रमुख यांनी शाळेचे कौतुक केले.

लोणी काळभोरला पत्रकारांना बांधल्या राख्या
लोणी काळभोर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या वतीने येथील पोलीस ठाण्यात रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी पोलीस आधिकारी, कर्मचारी व पत्रकार यांना राख्या बांधण्यात आल्या. या वेळी बोलताना सहायक पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या नात्यातील ओलावा जपणारा महत्त्वाचा सण आहे, असे मत व्यक्त केले. या वेळी राष्ट्रवादी किसान सभेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा विजया भोसले, जिल्हा उपाध्यक्षा प्रभावती सुरवसे, जिल्हा सरचिटणीस सुरेखा खोपडे, उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, हवालदार जयसिंग जाधव, प्रमोद गायकवाड, गणेश करचे यांच्यासह इतर महिला उपस्थित होत्या. उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांनी आभार मानले.

विद्यार्थ्यांनी झाडांना बांधल्या राख्या
बारामती : जनहित प्रतिष्ठानचे प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील प्राथमिक विभागात वृक्षांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. निसर्गातील वृक्षांमुळे मानवाचे जीवन खºया अर्थाने सुरक्षित रहाते. निसर्ग हाच आपला खरा रक्षणकर्ता आहे. त्यामुळे या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी वृक्षाला राखी बांधून तसेच विद्यार्थिनींनी विद्यार्थांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. संस्थेचे अध्यक्ष किशोर कानिटकर, उपाध्यक्ष श्रीकृष्ण कुलकर्णी, सचिव श्रीकृष्ण बहुळकर, खजिनदार सतिश धोकटे, तसेच सर्व संचालक, गुरुकुलचे आचार्य, प्राथमिकचे मुख्याध्यापक यांनी या उपक्रमाचे कौतूक केले.

पोलिसांना राखी बांधून सण साजरा
भोर : उन्नती भोर शहरातील महिला प्रतिष्ठानच्या वतीने रक्षाबंधनानिमित्त भोर पोलीस ठाण्यामधील पोलिसांना पारंपरिक पद्धतीने राखी बांधून मोठ्या उत्साहात सण साजरा करण्यात आला.
आजच्या धावपळीच्या जीवनात पोलिसांना बंदोबस्ताच्या कामातून वेळ मिळत नाही आणि अनेकांना रक्षाबंधन सणाला जाता येत नाही. त्यामुळे सामाजिक बांधिलकीच्या नात्याने भोर शहरातील उन्नती महिला प्रतिष्ठानच्या वतीने भोर पोलीस ठाण्यात रक्षाबंधन कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पोलीस निरीक्षक पांडुरंग सुतार, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सीमा तनपुरे, स्नेहा गुजर, पल्लवी फडणीस, द्रौपदा भेलके, निर्मला किंद्रे, शर्मिला खोपडे, शैला गुरव, शोभा गोसावी, पोलीस प्रदीप नांदे उपस्थित होते.
या वेळी पोलीस निरीक्षक पांडुरंग सुतार म्हणाले, की ‘‘ भोर शहरातील महिलांनी रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून पोलीस बांधवांना राखी बांधल्याने बहीणभावाचे नाते निर्माण झाले आहे. त्यामुळे बहिणीचे रक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांची असून सर्व भगिनींना सर्वतोपरी मदत करणार आहे. त्यामुळे युवतींनी चिंतामुक्तपणे शिक्षणाचा आनंद घ्यावा. ’’

Web Title: Environmental awareness done by Rakshabandhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.