‘स्लाइड शो’द्वारे पर्यावरणजागृती

By admin | Published: January 14, 2017 03:34 AM2017-01-14T03:34:25+5:302017-01-14T03:34:25+5:30

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या

Environmental awareness through 'slideshow' | ‘स्लाइड शो’द्वारे पर्यावरणजागृती

‘स्लाइड शो’द्वारे पर्यावरणजागृती

Next

मांजरी/हडपसर : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांना पर्यावरणविषयक जनजागृती करण्यासाठी पर्यावरण बचाओ व वाइल्डलाइफ प्राण्यांविषयी स्लाइड शो ारे माहिती देण्यात आली. या वेळी व्यासपीठावर महाविद्यालय प्राचार्य सुनील देव, उपप्राचार्य नितीन सावळे, मेकॅनिकल विभागप्रमुख दत्तात्रय मुळे, संगणक विभागप्रमुख रवींद्र मुळे, प्रा. विजय पाटील, सुनील तारू, हरिश्चंद्र देशमुख, राजेंद्र शेळके, कल्पना नलावडे यांसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांना विद्यार्थी संघाच्या वतीने पर्यावरणविषयक भित्तीपत्रके वाटून सामूहिक शपथ देण्यात आली.

Web Title: Environmental awareness through 'slideshow'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.