किल्ल्यांतून दिला पर्यावरणाचा संदेश
By Admin | Published: November 12, 2015 02:29 AM2015-11-12T02:29:29+5:302015-11-12T02:29:29+5:30
दिवाळीनिमित्त परिसरात मोठ्या संख्येने बाळगोपाळांसह युवकांनी किल्ले बनवले आहेत. किल्ल्याच्या माध्यमातून स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम काटेवाडी पाणी अडवा पाणी जिरवा
काटेवाडी : दिवाळीनिमित्त परिसरात मोठ्या संख्येने बाळगोपाळांसह युवकांनी किल्ले बनवले आहेत. किल्ल्याच्या माध्यमातून स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम काटेवाडी पाणी अडवा पाणी जिरवा, झाडे लावा वृक्ष जगवा असे प्रबोधनपर संदेश दिले आहेत.
विजयदुर्ग, सिंहगड, रायगड, शिवनेरी, सिंधुदुर्ग, प्रतापगड, पन्हाळा आदी किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे काटेवाडी परिसरात किल्ल्याची मांदियाळी दिसून येत आहे. शिवाजीनगर परिसरात महेश पाटोळे व अनिकेत खुडे या शाळेतील विद्यार्थ्यांनी विजयदुर्ग किल्ला बनवला आहे. त्यांनी निर्मलग्राम काटेवाडी गावाची प्रतिकृती साकारली आहे. तसेच बिरोबा तरुण मंडळांनी सिंधुदुर्ग किल्ला बनवून पाणी अडवा पाणी जिरवा असा संदेश दिला आहे. देसाई मित्र परिवार युवकांनी रायगड किल्ल्याची उभारणी केली आहे. ‘झाडे लावा वृक्ष वाढवा’ असे पर्यावरणासपूरक संदेश दिला आहे. कन्हेरी रस्त्यावरील धनी वस्ती येथील युवकांनी शिवनेरी किल्ल्यासह शिवसृषटी साकारली आहे.