सायकल प्रवासातून पर्यावरणाचा संदेश

By admin | Published: April 25, 2017 04:10 AM2017-04-25T04:10:31+5:302017-04-25T04:10:31+5:30

निगडी प्राधिकरणातील रहिवाशी आणि चिंचवड एमआयडीसीमधील सहायक अभियंता पदावर कार्यरत असणारे प्रकाश शेडबाळे

Environmental messages from bicycle travel | सायकल प्रवासातून पर्यावरणाचा संदेश

सायकल प्रवासातून पर्यावरणाचा संदेश

Next

निगडी : निगडी प्राधिकरणातील रहिवाशी आणि चिंचवड एमआयडीसीमधील सहायक अभियंता पदावर कार्यरत असणारे प्रकाश शेडबाळे यांनी कडाक्याच्या उन्हात निगडी ते शिर्डी असा सायकलवरून प्रवास करून पर्यावरण बचावाचा संदेश दिला आहे.
सायकल वापरण्याने पर्यावरण तसेच आरोग्यासाठी होणाऱ्या फायद्यांबाबत जनजागृती करण्यासाठी त्यांनी नुकताच निगडी ते शिर्डी २२१ किमीचा असा सायकल प्रवास केला. ४५ वर्षीय शेडबाळे यांनी सलग १९ तास सायकल प्रवास करून शिर्डीचे दर्शन घेतले. त्यांनी केलेल्या या प्रयत्नाचे शिर्डी देवस्थानानेही भरभरून कौतुक केले. व देवस्थानच्या पुजारी वाळुंजकर यांनी त्यांचा सत्कार केला.
सायकल चालविण्याने आरोग्याला होणारे फायदेही त्यांनी अनुभवले होते. विशेषत: वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सायकल हे चांगले माध्यम आहे, असे त्यांचे मत आहे. त्यातूनच त्यांना शिर्डीपर्यंतचा प्रवास सायकलने करण्याची कल्पना सूचली. समाजाला चांगला संदेश देता येईल, या भावनेने त्यांनी निर्णय पक्का केला. त्यासाठी दोन- तीन महिने सलग सायकल चालविण्याचा सराव केला. त्यातून जिद्द अधिकच वाढली. दोन एप्रिलला पहाटे तीन वाजता निगडी येथील राहत्या घरापासून शिर्डीकडे कूच केली. उन्हाचा पारा चढल्यानंतर सायकलप्रवास करणे बरेच जड गेले. त्रास जाणवत असल्याने त्यांनी नगरच्या अगोदर असलेल्या चास गावात दोन तास विश्रांती घेतली.
निगडी-शिक्रापूर- रांजणगाव- नगर राहुरीमार्गे ते रात्री दहा वाजता शिर्डीला पोचले. या मोहिमेसाठी त्यांना ‘इंडो सायकल क्लब’चे धनंजय शेडबाळे, अजित पाटील, सुनील पाटील, डॉविकास पाटील, चंद्रकांत शिंदे, संजय पाटील, कोमल पाटील यांचे सहकार्य मिळाले. (वार्ताहर)

Web Title: Environmental messages from bicycle travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.