शांतीराज दूतांनी दिली श्री संभाजी विद्यालयाला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:13 AM2021-02-26T04:13:10+5:302021-02-26T04:13:10+5:30
या भेटीचे मुख्य उद्दिष्टे गावातील शाळांना भेट देणे, तेथे असलेल्या सुविधांचे व उणिवांचे निरीक्षण करणे हे होते. एलपीएफच्या ...
या भेटीचे मुख्य उद्दिष्टे गावातील शाळांना भेट देणे, तेथे असलेल्या सुविधांचे व उणिवांचे निरीक्षण करणे हे होते. एलपीएफच्या वतीने आलेल्या टीमने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री संभाजी विद्यालयाला भेट दिली.
या वेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वंदना पाचपुते, शिक्षिका अनघा घोडके यांनी एलपीएफकडून आलेल्या शांतीराज दूतांशी संवाद साधला. तसेच शाळेतील गुणवंत विद्यार्थी यांची शिक्षण तसेच क्रीडा, कला व सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभागाबद्दल माहिती दिली.
विद्यालयातील उल्लेखनीय बाब म्हणजे मुलींनी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत मिळवलेले यश होय. विद्यालयात ५ वी ते १० वी सेमी इंग्रजी व मराठी माध्यम असे २० वर्ग सुरू आहेत. शाळेतील एकूण विद्यार्थी संख्या ४०८ आहे. त्यातील विद्यार्थिनींची संख्या १८६ आहे.
श्री संभाजी विद्यालयाची पाहणी करताना एलपीएफकडून रिता सेठीया, राधिका घोलप, ऐश्वर्या काशीद, रमा झा व इतर ८ मुली सहभागी होत्या. सदर कार्यक्रमास गावातील ग्रामस्थांनी मोलाचा सहभाग दाखवला. या वेळी उपसरपंच दिनेश जाधव, माजी सरपंच पुष्मा अमोल कोरडे, युवराज कोरडे, ग्रामपंचायत सदस्य अश्विनी कोरडे, सुनील घोलप आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास गावातील ग्रामस्थांनी मोलाचा सहभाग दाखवला. त्या वेळी उपसरपंच दिनेश जाधव, माजी सरपंच पुष्पा अमोल कोरडे, श्री युवराज कोरडे , ग्रामपंचायत सदस्य अश्विनी कोरडे, आणि सुनील घोलप आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
२५ खोडद भेट
एलपीएफ संस्थेच्या शांतीराज दूतांनी बोरी बुद्रुक येथील श्री संभाजी विद्यालयाला भेट दिली.