साहित्य, नाट्य संमेलन अनुदानावर समान भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 05:04 AM2017-11-06T05:04:20+5:302017-11-06T05:04:34+5:30
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शासनातर्फे मिळणारे अनुदान महामंडळाच्या खात्यात जमा होण्याची मागणी महामंडळानेच केली होती.
पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शासनातर्फे मिळणारे अनुदान महामंडळाच्या खात्यात जमा होण्याची मागणी महामंडळानेच केली होती. महामंडळाने नव्याने मागणी केल्यास अनुदानाचा निर्णय बदलला जाईल, अशी माहिती सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी येथे दिली. नाट्यसंमेलनाचे अनुदान कोणाच्या खात्यावर जमा करायचे यावर एकमत होत नसल्याने ते रखडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी भेटण्यासाठी वेळ मागितली नव्हती, अन्यथा मी नकार दिला नसता, असे ते म्हणाले. मराठी चित्रपटांच्या तिकिटांवर वस्तू व सेवा कराचा परिणाम झालेला नसून, निर्मात्यांच्या मागणीमुळे त्यावर पुन्हा करमणूक कर लागला आहे. अनुदान दिल्या जाणाºया मराठी चित्रपटांना त्याची एक प्रत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात (एनएफएआय) दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.